विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : देशात विरोधक वेगवेगळ्या मुद्द्यांवर सरकारला घेरतच असतात पण सध्या सर्व विरोधकांचा देशात जातनिहाय जनगणना करण्याचा आग्रह टोकाला गेला आहे. त्याचवेळी भारतात मोठी धोक्याची घंटा वाजली आहे. कारण भारताने चीनची लोकसंख्या ओलांडली आहे. भारत क्षेत्रफळाच्या दृष्टीने सध्या चीन पेक्षा 7 पटींनी लहान आहे, पण लोकसंख्या मात्र भारताची अव्वल होऊन चीन दुसऱ्या क्रमांकावर गेला आहे. मात्र त्याच वेळी भारतात लोकसंख्या नेमकी कोणाची वाढली आहे??, हा अत्यंत महत्त्वाचा सवाल तयार झाला आहे. India surpasses China to become the world’s most populous nation with 142.86 crore people
जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश आता चीन राहिला नसून भारत झाला आहे. युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंड (UNFPA)च्या ताज्या आकडेवारीने याची पुष्टी केली आहे. UNFPA च्या आकडेवारीनुसार, भारत आता जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश आहे. भारतात चीनपेक्षा 29 लाख लोकसंख्या जास्त आहे आणि देशाची लोकसंख्या वाढून 140 कोटींच्या पुढे गेली आहे. चीनमधला जन्मदर यंदा चांगलाच खाली घसरला असल्याने त्यांची लोकसंख्या काहीशी आटोक्यात येत आहे.
UNFPA चा ‘द स्टेट ऑफ वर्ल्ड पॉप्युलेशन रिपोर्ट 2023’ हा ‘8 बिलियन लाइव्स, इनफिनिट पॉसिबिलिटीज: द केस फॉर राइट्स अँड चॉइस’ या शीर्षकाने प्रसिद्ध केला गेला आहे. यात नमूद केल्याप्रमाणे भारताची लोकसंख्या आता 1,428.6 दशलक्ष आहे, तर चीनची लोकसंख्या 1,425.7 दशलक्ष आहे. म्हणजेच दोन्ही देशांच्या लोकसंख्येमध्ये 2.9 दशलक्ष इतका फरक आहे.
युनायटेड नेशन्सच्या लोकसंख्या आकडेवारीत 1950 पासून भारताची लोकसंख्या चीनपेक्षा जास्त नोंदवली जाण्याची ही पहिलीच वेळ आहे.
2023 मध्ये भारताची लोकसंख्या 1,428,627,663 आहे, जी 2022 च्या तुलनेत 0.81% जास्त आहे.
2022 मध्ये भारताची लोकसंख्या 1,417,173,173 होती, जी 2021 च्या तुलनेत 0.68% जास्त होती.
2021 मध्ये भारताची लोकसंख्या 1,407,563,842 होती, जी 2020 च्या तुलनेत 0.8% जास्त होती.
2020 मध्ये भारताची लोकसंख्या 1,396,387,127 होती, जी 2019 च्या तुलनेत 0.96% अधिक होती.
India surpasses China to become the world's most populous nation with 142.86 crore people, says the United Nations. According to UNFPA's The State of World Population Report, 2023, India's population has reached 1,428.6 million while China's stands at 1,425.7 million, a… pic.twitter.com/kl3qexumkP — ANI (@ANI) April 19, 2023
India surpasses China to become the world's most populous nation with 142.86 crore people, says the United Nations.
According to UNFPA's The State of World Population Report, 2023, India's population has reached 1,428.6 million while China's stands at 1,425.7 million, a… pic.twitter.com/kl3qexumkP
— ANI (@ANI) April 19, 2023
जगातील सर्वात जास्त तरुण लोकसंख्याही भारतात
UNFPA अहवालानुसार भारतातील 25% लोकसंख्या 0-14 वयोगटातील, 18% लोकसंख्या 10-19 वयोगटातील, 26% लोकसंख्या 10-24 वयोगटातील, 68% लोकसंख्येत 15-64 वर्षे वयोगटातील लोक आहेत आणि 65 वयोगटावरील 7% लोक आहेत.
चीनमध्ये जननदर घटला, वृद्धांची संख्या अधिक
चीनमध्ये संबंधित आकडेवारी अनुक्रमे 17%, 12%, 18%, 69% आणि 14% अशी आहे. चीनमध्ये 65 वर्षांवरील लोकांची संख्या 20 कोटी, म्हणजेच वयोवृद्धांची संख्या चीनमध्ये भारतापेक्षा दुप्पट आहे. काही दशकांपूर्वी, चीन सरकारने 1 मूल धोरण लागू केले होते, सरकारच्या या धोरणामुळे लोकांनी मुलांना जन्म देणेच बंद केले होते.
लोकसंख्या वाढविण्याचे चीनचे प्रयत्न
आता चीनमध्ये परिस्थिती अशी आहे की सरकार म्हणते, दोन किंवा त्यापेक्षा जास्त अपत्यांना जन्म देणाऱ्या जोडप्यांना अनेक सुविधा दिल्या जातील. चीनमध्ये अनेक महाविद्यालयांनी तर अजब घोषणा केली आहे. त्यांच्या घोषणेप्रमाणे, तरुण मुला-मुलींनी किमान दिवस ‘स्प्रिंग ब्रेक’म्हणजेच सुट्टीवर जावे, जेणेकरुन त्यांना प्रेमात पडण्यासाठी आणि घर बसवून मुलांना जन्म देण्यासाठी वेळ मिळेल.
जननदर नियंत्रणाला धार्मिक विरोध
भारतात मात्र काही विशिष्ट वर्गांचा जननदर स्थिर राहून काही ठिकाणी तो घटला आहे, पण काही ठिकाणी काही विशिष्ट वर्गांचा जननदर वाढला असून त्यामुळे मोठ्या प्रमाणावर लोकसंख्यात्मक परिवर्तनाला भारताला तोंड द्यावे लागत आहे. जननदर नियंत्रित करणे काही विशिष्ट धार्मिक रूढी मानणाऱ्या समुदायाला मान्य नाहीत. त्यामुळे वाढती लोकसंख्या ही भारतात राजकीय, सामाजिक आणि धार्मिक पातळीवर एक मोठी समस्या बनून समोर आली आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App