प्रतिनिधी
मुंबई : पाकिस्तान इस्लामच्या नावावर जगभरात दहशतवाद पसरवत आहेत. त्यामुळे इस्लाम आणि दहशतवाद या एका नाण्याच्या दोन बाजू असल्याचे चित्र जगभरात पोहोचत आहे. ते पुसण्यासाठी सौदी अरेबिया आणि यूएईने पुढाकार घेतला असून, इस्लाम आणि दहशतवाद यांचा संबंध तोडण्यासाठी या देशांना भारत सर्वतोपरी मदत करीत असल्याचे भाजपा नेते राम माधव यांनी सांगितले. India supports Saudi and UAE to break terrorism-Islam links
पांचजन्यतर्फे आयोजित ‘२६/११ मुंबई संकल्प’ परिषदेत ते बोलत होते. शुक्रवारी, २५ नोव्हेंबर रोजी फोर्ट येथील हॉटेल ताजमहाल पॅलेसमध्ये ही परिषद आयोजित करण्यात आली आहे. पहिल्या सत्राला संबोधित करताना माधव म्हणाले, इस्लामोफोबिया ही संकल्पना केवळ पाकिस्तानमुळे अस्तित्त्वात आली. इस्लामच्या नावावर ते दहशतवाद पसरवत आहेत. भारतात १८ कोटी मुस्लीम शांततेत राहतात. इकडे कोणामध्ये इस्लामोफोबिया दिसत नाही. त्यामुळे पाकिस्तानच्या नापाक कृत्यांमुळे जगभरात इस्लामचा होणारा अपप्रचार थांबवण्यासाठी यूएई, सौदी यांसारखे देश पुढे आले आहेत. त्यांना भारत सर्वतोपरी मदत करीत आहे.
PFI ची मायावी रुपे : एकट्या PFI बंदी नव्हे, तर रिहैब फाउंडेशनसह “या” 9 उपसंस्थांवर बंदी!!
दहशतवादाचे अनेक छुपे प्रकार
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App