भारताच्या अग्नी पी क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी, 2 हजार किमीपर्यंत मारक क्षमता

शनिवारी भारताच्या खात्यात आणखी एक यश आले आहे. अग्नी पी बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी पार पडली. हे क्षेपणास्त्र नवीन पिढीचे तसेच आण्विक क्षमतेचे आहे. India successfully test-fired Agni P missile, has a firepower of 2 thousand kilometers


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : शनिवारी भारताच्या खात्यात आणखी एक यश आले आहे. अग्नी पी बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी पार पडली. हे क्षेपणास्त्र नवीन पिढीचे तसेच आण्विक क्षमतेचे आहे.

ओडिशाच्या बालासोर किनार्‍यावरील डॉ. एपीजे अब्दुल कलाम बेटावरून नवीन पिढीच्या अण्वस्त्र सक्षम बॅलिस्टिक क्षेपणास्त्र अग्नी पीची यशस्वी चाचणी घेण्यात आली. पूर्व किनारपट्टीवर असलेल्या टेलीमेट्री आणि रडार स्टेशनच्या मदतीने ही चाचणी घेण्यात आली.



अग्नी-पी क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी डीआरडीओचे अभिनंदन केले. ते म्हणाले की, भारत ही एक उदयोन्मुख अर्थव्यवस्था आहे, जी विकासाच्या दिशेने वाटचाल करू लागली आहे. राजनाथ सिंह म्हणाले की, आमच्याकडे तरुण प्रशिक्षित वैज्ञानिक, तांत्रिक आणि व्यवस्थापकीय प्रतिभा आहेत. त्याच वेळी, DRDO अध्यक्ष डॉ. जी. सतीश रेड्डी यांनी यशस्वी चाचणी आयोजित केल्याबद्दल टीमच्या प्रयत्नांचे कौतुक केले.

India successfully test-fired Agni P missile, has a firepower of 2 thousand kilometers

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात