India – Sri lanka : भारताची श्रीलंकेला अवघ्या 3 महिन्यांत 2.5 अब्ज डॉलरपेक्षा अधिक मदत!!

वृत्तसंस्था

कोलंबो : चीनच्या कर्जाखाली संपूर्ण दबून गेलेली श्रीलंका आर्थिक दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभी असताना आणि तेथे सर्वसामान्य जनतेची अन्नान्नदशा झाली आहे. या पार्श्वभूमीवर “नेबर फर्स्ट” या धोरणानुसार भारताने श्रीलंकेला भरघोस मदत केली आहे. जानेवारी 2022 पासून मार्च 2022 अखेरपर्यंत अवघ्या 3 महिन्यांमध्ये भारताने श्रीलंकेला केलेली मदत अडीच अब्ज डॉलरच्या पुढे पोहोचली आहे, अशी माहिती भारताचे श्रीलंकेतील राजदूत गोपाळ बागले यांनी दिली आहे. India – Sri Lanka: India donates more than 2.5 2.5 billion to Sri Lanka in just 3 months !!

श्रीलंका चीनच्या कर्जाच्या बोजाखाली एवढी दबली आहे की देश आर्थिक दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभा आहे. जनतेच्या जगण्याच्या सर्वसामान्य वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहेतच पण अनेक ठिकाणी प्रचंड टंचाई निर्माण झाली आहे. श्रीलंकेत अन्नासाठी मोठ्या रांगा लागल्या आहेत. आर्थिक परिस्थिती हाताळणे तिथल्या सरकारच्या क्षमते बाहेर पोहोचले आहे.

या पार्श्वभूमीवर भारताने मानवतावादी दृष्टिकोनातून श्रीलंकेला अन्न औषधे आणि आर्थिक मदत केली आहे. ही सर्व प्रकारची मदत मिळून गेल्या 3 महिन्यांमध्ये अडीच अब्ज डॉलरपेक्षा अधिक मदत श्रीलंकेला करण्यात आल्याची माहिती गोपाळ बागले यांनी दिली आहे.

India – Sri Lanka: India donates more than 2.5 2.5 billion to Sri Lanka in just 3 months !!

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात