भारताची जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्य निदेर्शांकांत १५० व्या ठिकाणी घसरण झाली आहे. २०२२ मध्ये भारताचे स्थान १४२ होते. ते घसरून १५० आले आहे. जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्य निदेर्शांकाची वर्ष २०२२ ची आवृत्ती रिपोर्टस विथआउट बॉर्डर्सने (आरएसएफ) प्रकाशित केली आहे. india ranks 150th in the world in terms of newspaper freedom
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भारताची जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्य निदेर्शांकांत १५० व्या ठिकाणी घसरण झाली आहे. २०२२ मध्ये भारताचे स्थान १४२ होते. ते घसरून १५० आले आहे. जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्य निदेर्शांकाची वर्ष २०२२ ची आवृत्ती रिपोर्टस विथआउट बॉर्डर्सने (आरएसएफ) प्रकाशित केली आहे.
१८० देश आणि प्रदेशातील पत्रकारितेच्या अवस्थेचे मूल्यमापन या आवृत्तीत करण्यात आले आहे. जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्य निदेर्शांक २०२२ मध्ये बातमी आणि माहितीमधील अराजकतेमुळे झालेल्या भीषण, तसेच कोणतेही निर्बंध नसलेल्या ऑनलाईन माहितीच्या परिणामांकडे लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. निर्बंध नसलेल्या माहितीमुळे बनावट बातम्या आणि प्रचाराला उत्तेजन मिळते.
पाकिस्तान १५७ व्या. मध्यपूवेर्तील देशांमध्ये वृत्तपत्र स्वातंत्र्याची उणीव असल्यामुळे इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यातील संघर्षावर परिणाम होतो. या निदेर्शांकात इस्रायल ८६ व्या, तर पॅलेस्टाईन १७० व्या स्थानावर आहे, तसेच २८ देशांमध्ये परिस्थिती फारच वाईट असल्याचे म्हटले आहे. पहिले स्थान नॉवेर्ने, दुसरे डेन्मार्क तर तिसरे स्वीडन आहे. वृत्तपत्र स्वातंत्र्याच्या निदेर्शांकाखाली शेवटी असलेल्या १० देशांत चीन, उत्तर कोरिया, इराण, क्युबा आणि म्यानमारचा समावेश आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App