वृत्तसंस्था
वॉशिंग्टन : भारताला पाच हजार अब्ज डॉलरची अर्थव्यवस्था बनायचे असल्यास दरवर्षी किमान १०० अब्ज डॉलरची थेट परकी गुंतवणूक आकर्षित करायला हवी, असे मत ‘अमेरिका-भारत धोरणात्मक आणि भागीदारी मंचा’चे अध्यक्ष मुकेश अघी यांनी व्यक्त केले. India must attract 100 billion foreign investment every year
एका मुलाखतीदरम्यान मुकेश अघी म्हणाले,‘‘ भारताची सध्याची अर्थव्यवस्था २.७ हजार अब्ज डॉलरची आहे. येथून पाच हजार अब्ज डॉलरपर्यंत मजल मारायची आहे. ही झेप मारण्यासाठी दरवर्षी १०० अब्ज डॉलरची परकी गुंतवणूक आकर्षित करावी लागेल. ही गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी काय करता येईल, याचा भारताने विचार करावा.’’
भारत आणि अमेरिकेतील भागीदारी येत्या काही काळात वृद्धींगत होण्याची दाट शक्यता असल्याचेही त्यांनी सांगितले. अमेरिकेत सध्या ४५ लाख भारतीय आहेत. ते विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत आहेत. या गोष्टीचा सकारात्मक परिणाम होऊन दोन देशांमधील संबंध आणखी दृढ होऊ शकतात, असेही मुकेश अघी म्हणाले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App