7 सप्टेंबर ते 20 नोव्हेंबर : भारत जोडो यात्रेची पंतप्रधान नरेंद मोदींकडून पहिल्यांदा दाखल; ती सुद्धा मेधा पाटकर सामील झाल्यावर

वृत्तसंस्था

अहमदाबाद : काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी 7 सप्टेंबर 2022 रोजी सुरू केलेल्या भारत जोडो यात्रेची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अखेर 20 नोव्हेंबर 2022 रोजी दखल घेतली आहे. 7 सप्टेंबर पासून राहुल गांधी भारत जोडो यात्रेत कन्याकुमारी पासून निघाले आहेत. ही यात्रा निम्मी सरून महाराष्ट्रात पोहोचून आज तिने मध्य प्रदेश कडे कुच केली आहे. त्या दिवशी म्हणजे 20 नोव्हेंबर 2022 रोजी पंतप्रधान मोदींनी यात्रेची दखल घेतली आहे.  India Jodo Yatra first filed by Prime Minister Narend Modi; After she also joined Medha Patkar

राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर या यात्रेदरम्यान दररोज वेगवेगळ्या मुद्द्यांवर निशाणा साधला पण आजपर्यंत मोदींनी या यात्रेविषयी चकार शब्द देखील काढला नव्हता. पण गुजरातच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान ढोराजी येथे जाहीर सभेत बोलताना पंतप्रधान मोदींनी भारत जोडो यात्रेचा उल्लेख केला, तो देखील राहुल गांधी यांचा नव्हे, तर नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्यांना मेधा पाटकर यांचा!! मेधा पाटकर यांचे नाव न घेता त्यांनी काँग्रेस आणि पाटकर यांच्यावर निशाणा साधला. काँग्रेसचे नेते गुजरातचे भवितव्य नष्ट करायला येत आहेत.

त्यांच्याबरोबर अशी महिला फोटोमध्ये उभी असलेली दिसते, जिने नर्मदा प्रकल्पाला प्रखर विरोध केला. स्थानिक पातळीपासून वर्ल्ड बँकेपर्यंत गुजरातला कुठलाही पैसा नर्मदा प्रकल्पासाठी मिळू नये याचे प्रयत्न केले. ती महिला काँग्रेस नेत्यांबरोबर फोटोत उभी दिसत आहे. याचा अर्थ तुम्ही समजून घ्या. गुजरातला संजीवनी देणाऱ्या प्रकल्पाला म्हणजे नर्मदा प्रकल्पाला ज्यांनी विरोध केला, त्यांच्याबरोबर काँग्रेसचे नेते गुजरातचे भवितव्य नष्ट करायला येत आहेत, अशा प्रखर शब्दांमध्ये नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसच्या नेत्यांवर आणि मेधा पाटकर यांच्यावर निशाणा साधला.

राहुल गांधी हे 7 सप्टेंबर 2022 पासून भारत जोडो यात्रेत आहेत. कन्याकुमारी पासून निघालेली यात्रा तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, तेलंगण या प्रदेशांमधून येऊन महाराष्ट्रात पोहोचली. आज 20 नोव्हेंबर 2022 रोजी ही यात्रा महाराष्ट्र बाहेरही गेली. एवढ्या दिवसांमध्ये मोदींनी या यात्रेची दखलही घेतली नव्हती. तशा आशयाच्या बातम्या देखील विविध प्रसार माध्यमांनी दिल्या होत्या. पण या बातम्या येऊन देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी अथवा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेविषयी चकार शब्दही काढला नव्हता. त्याकडे पूर्ण दुर्लक्ष केले होते. यात्रेचा टीआरपी घसरला होता. शेवटी सावरकरांचा मुद्दा महाराष्ट्रात काढून यात्रेला पुन्हा टीआरपी मिळवण्यात काँग्रेसचे नेते काहीसे यशस्वी झाले.

आणि आता गुजरात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने का होईना, पण पंतप्रधान मोदींनी काँग्रेस नेत्यांबरोबर नर्मदा प्रकल्पाला विरोध करणारी महिला उभी आहे, हे समजून घ्या अशा भाषेत भारत जोडो यात्रेची दखल घेतली आहे. आता त्यांनी दखल घेण्याच्या मुद्द्याचा भारत जोडो यात्रेच्या टीआरपी वर कितपत परिणाम होतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

India Jodo Yatra first filed by Prime Minister Narend Modi; After she also joined Medha Patkar

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात