वृत्तसंस्था
नवी दिल्ली : Meghalaya जगभरातील प्रदूषित शहरांबाबत नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, २० सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये भारतातील १३ शहरांचा समावेश आहे. मेघालयातील बर्निहाट शहर हे जगातील सर्वात प्रदूषित शहर ठरले आहे. सर्वात प्रदुषित राजधानीमध्ये दिल्ली अव्वल आहे. स्विस एयर क्वॉलिटी टेक्नोलॉजी कंपनी आयक्यूच्या “जागतिक हवा गुणवत्ता अहवाल २०२४’ मधून हे निष्कर्ष काढण्यात आले आहेत.Meghalaya
२०२४ मध्ये भारत जगातील पाचवा सर्वाधिक प्रदूषित देश असल्याचे समोर आले आहे. २०२३ मध्ये या यादीत भारत तिसऱ्या स्थानावर होता. आता त्यामध्ये काहीशी सुधारणा झाली आहे. पाकिस्तानचे चार शहरे आणि चीनच्या एका शहराचा पहिल्या २० सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये समावेश आहे. या अहवालानुसार २०२४ मध्ये भारतात हवेतील पीएम २.५ मध्ये ७ टक्क्यांची घट झाल्याचे समोर आले. पीएम २.५ मायक्रॉनपेक्षा लहान सूक्ष्म प्रदूषक कण आहेत, जे थेट फुफ्फुसांमध्ये प्रवेश करून रक्तप्रवाहात मिसळतात आणि आरोग्यास हानिकारक ठरतात.
२०२३ मध्ये पीएम२.५चे प्रमाण ५४.४ प्रति घनमीटरवरून कमी होऊन ५०.६ इतके झाले होते. दिल्लीत वायू प्रदूषण वाढले आहे. २०२३ मध्ये दिल्लीत पीएम २.५ चे वार्षिक सरासरी प्रमाण १०२.४ वरून वाढून २०२४ मध्ये ते १०८.३ मायक्रोग्राम प्रति घनमीटर इतके झाले. देशातील सर्वात प्रदूषित शहरात पहिल्या २० मध्ये बर्निहाट, दिल्ली, पंजाबचे मुल्लांपूर, फरीदाबाद, लोणी, गुरूग्राम, गंगानगर, ग्रेटर नोएडा, भिवाडी, मुजफ्फनगर, हनुमानगड व नोएडा यांचा समावेश आहे.
बर्निहाट टाॅप का?… प्लास्टिक, सिमेंट कारखान्यांतून विषारी वायूंचे उत्सर्जन
बर्निहाट हे मेघालय सीमेवरील एक औद्योगिक शहर आहे. येथे मद्य निर्मिती, लोह खनिजावर प्रक्रिया, सिमेंट कारखाने विविध शितपेय, टायर-ट्यूब, पाॅलिथिन निर्मितीचे अनेक कारखाने आहेत. यामुळे कधीकाळी शांत असलेला हा प्रदेश विषारी गॅसचे गोदाम बनला आहे. कारखान्यातून २४ तास २.५चे कण उत्सर्जित होतात. आसाम-मेघालयाच्या मधील हा प्रमुख कॅरिडोर आहे. त्यामुळे कार्बन उत्सर्जन मोठ्या प्रमाणात होते. शहराच्या भाैगोलिक स्थितीमुळे हा धूर काळ्याकुट्ट ढगांच्या रूपाने शहरावरच पसरलेला दिसतो.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App