विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना तुरुंगातून सोडवण्यासाठी INDI आघाडीने दिल्लीतल्या रामलीला मैदानात प्रचंड मोठी एकजूट दाखवून मोदी सरकारला ठोसा हाणला, पण भ्रष्टाचारी कितीही मोठा असला तरी कारवाई करणारच, असा दणका पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मेरठ मधून दिला.INDI leaders push from Delhi to release Kejriwal; No matter how big the corrupt person is, he will take action, Modi’s bang from Meerut!!
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज उत्तर भारतात दोन महारॅल्यांचे धुमशान होते. त्यातली पहिली रॅली INDI आघाडीने दिल्लीच्या रामलीला मैदानात घेतली. सगळ्या विरोधकांची तिथे एकजूट झाली. सगळ्यांनी मिळून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेल यांना तुरुंगातून सोडवण्यासाठी वज्रमुठीचा ठोसा मोदी सरकारला हाणला. सोनिया गांधी, राहुल गांधी, सुनीता केजरीवाल, प्रियांका गांधी, मल्लिकार्जुन खर्गे, कल्पना सोरेन, उद्धव ठाकरे, शरद पवार या सगळ्या नेत्यांनी मोदी सरकारवर आरोपांच्या फैरी झाडल्या. मोदी सरकारच्या सूडाच्या राजकारणाचा अंत करण्याची प्रतिज्ञा केली. स्वतः केजरीवालांनी तुरुंगातून संदेश धाडत 140 कोटी भारत यांना 6 गॅरेंटी दिल्या. प्रियांका गांधींनी मोदींना अख्खे रामायण सुनावले. त्यामुळे दिल्लीतले वातावरण प्रचंड तापले.
पण दिल्लीतली रॅली संपून काही तासच उलटले नाहीत, तोच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उत्तर प्रदेशातील मेरठ मधून INDI आघाडीवर तोफा डागल्या. चौधरी चरण सिंह सन्मान समारोहात त्यांनी विरोधकांना आपल्या पट्ट्यात घेतले. दिल्लीतला रामलीला मैदानातल्या सगळ्या भाषणांचा मोदींनी आपल्या भाषणातून समाचार घेतला. मी भ्रष्टाचाराविरुद्ध कारवाई करतो आहे आणि सगळे भ्रष्टाचारी स्वतःला वाचवण्यासाठी एकजूट करून आरडाओरडा करत आहेत, पण मी भ्रष्टाचाऱ्यांवर कारवाई करतच राहणार. त्यांनी लुटलेला पैसा जनतेला वाटणार. भ्रष्टाचारी कितीही मोठा असला तरी त्याच्याविरुद्धची कारवाई थांबणार नाही, असा निर्वाळा मोदींनी दिला.
त्यामुळे दिल्ली बरोबर उत्तर प्रदेशातले देखील वातावरण प्रचंड तापले. कारण दोन्हीकडे सत्ताधारी आणि विरोधक आपापल्या समर्थकांची गर्दी जमविण्यात यशस्वी झाले होते. त्यामुळे खऱ्या अर्थाने आज एका दिवसातच उत्तर भारतातले सगळे वातावरण राजकीय दृष्ट्या तापले. आता ते तापमान आगामी काळात आणखी वाढणार आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App