दिल्लीत चंद्राबाबूंची चुचकारणी, मुंबईत त्यांच्या पत्नी विरुद्ध सेबीकडे तक्रारी; INDI आघाडीची खेळी की बसेना ताळमेळी??

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : लोकसभेत मोदी सरकारला जेरीस आणण्यासाठी सभागृहाचे सभापती पद भाजपकडून हिसकावून घेताना INDI आघाडीतल्या नेत्यांना तेलगू देशमचे नेते आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांची गरज आहे. त्यामुळे ते त्यांना चुचकारत आहेत, पण दुसरीकडे मोदी शाह यांना टार्गेट करताना मुंबईत INDI आघाडीच्या नेत्यांनी चंद्राबाबूंच्या पत्नी भुवनेश्वर यांच्या कंपनीला 521 कोटींचा फायदा कसा झाला?? याबद्दल सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया कडे तक्रार केली आहे. INDI alliance trying to convince Chandrababu naidu, but other leaders complained against his wife in SEBI

त्यामुळे एकीकडे चंद्राबाबू नायडूंची चुचकारणी आणि दुसरीकडे त्यांच्याच पत्नी विरुद्ध सेबीकडे तक्रारी अशी INDI आघाडीची खेळी आहे की त्यांच्यातच ताळमेळ बसेनासा झाला आहे??, असा सवाल तयार झाला आहे.



लोकसभेचे सभापती पद एनडीए आघाडीतल्या घटक पक्षांना देण्याऐवजी ते भाजपकडेच ठेवावे, असा भाजप नेत्यांचा आग्रह आहे. या आग्रहाला काटशह देण्यासाठी INDI आघाडीच्या नेत्यांनी एक खेळी करत चंद्राबाबू नायडूंची चुचकारणी चालवली आहे. चंद्राबाबूच्या तेलगू देशम पक्षाने लोकसभेच्या सभापती पदासाठी उमेदवार उभा करावा. INDI आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा देईल, असे वक्तव्य शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी केले. मात्र INDI आघाडीचा 234 हा खासदारांचा आकडा 250 पर्यंत देखील जात नाही, याकडे मात्र त्यांनी दुर्लक्ष केले.

पण एकीकडे चंद्राबाबूंची अशीच चुचकारणी चालू असताना दुसरीकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी प्रत्यक्ष निवडणुका सुरू असताना शेअर्स खरेदी करा. त्याचा लाभ होईल, असे आवाहन मतदारांना केले होते. प्रत्यक्षात शेअर खरेदी करणाऱ्यांचा 30 लाख कोटी रुपयांचा तोटा झाला, पण त्यामध्ये फक्त चंद्राबाबू नायडू यांच्या पत्नी भूवनेश्वरी यांच्या कंपन्यांचा 521 कोटी रुपयांचा फायदा झाला, असा दावा INDI आघाडीतले घटक पक्ष तृणमूळ काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस यांनी केला. या सगळ्या पक्षाच्या नेत्यांनी शरद पवारांच्या “सिल्वर ओक” निवासस्थानी बैठक घेतली आणि त्यानंतर ते “सेबी” ऑफिस मध्ये तक्रार दाखल करायला गेले. यामध्ये तृणमूल काँग्रेसच्या खासदार सागरिका घोष, कल्याण बॅनर्जी, शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आदी नेते होते. एकीकडे मोदी – शाह यांना काटशह देण्यासाठी INDI आघाडीतल्या नेत्यांना चंद्राबाबू नायडूंची मदत हवी आहे, तर दुसरीकडे ते त्यांच्याच पत्नी विरोधात सेबीकडे तक्रार करून त्यांच्यावर दबाव आणत आहेत. मात्र, या राजकारणाला चंद्राबाबू कसे उत्तर देणार आणि भाजप INDI आघाडीच्या या खेळीला कसे प्रत्युत्तर देणार??, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

INDI alliance trying to convince Chandrababu naidu, but other leaders complained against his wife in SEBI

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात