विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : 2024 च्या लोकसभा निवडणुकीत तब्बल 400 जागांवर भाजपला एकाच एक टक्कर देण्याचा INDI आघाडीचा मनसुबा पण आडवी आली केजरीवालांची “विपश्यना”!!, अशा स्थितीत INDI आघाडी अडकली आहे.INDI alliance pledging for one to one fight against BJP, but kejriwal, akhilesh, mamata and stalin may apply break!!
मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या 3 राज्यांमध्ये काँग्रेसने सपाटून मार खाल्ल्यानंतर मनोधैर्य गमावलेल्या काँग्रेसने INDI आघाडीची बैठक पुढे ढकलली होती. ती बैठक आता 19 डिसेंबरला दिल्लीत होणार आहे. या बैठकीला शरद पवार, उद्धव ठाकरे, नितीश कुमार, ममता बॅनर्जी, एम. के. स्टालिन हे प्रमुख नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे. परंतु आयत्या वेळेला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे विपश्यनेला जाणार आहेत. 19 डिसेंबर ते 23 डिसेंबर या कालावधीत अरविंद केजरीवाल विपश्यना करणार आहेत. त्यामुळे INDI आघाडीतल्या नेत्यांच्या मनसुब्यावर जागा वाटपाच्या चर्चेच्या पहिल्याच मुहूर्तावर पाणी फेरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
कारण 19 तारखेच्या INDI आघाडीच्या बैठकीत सर्व नेते मिळून भाजप विरोधात किमान 400 उमेदवार एकास एक देता येतील का??, याचा विचार करणार आहेत. त्या दृष्टीने जागा वाटपाची चाचपणी करण्यात येणार आहे. ही जागा वाटपाची चाचपणी 300 ते 400 जागांदरम्यान जरी यशस्वी झाली, तरी भाजपशी खऱ्या अर्थाने एकास एक टक्कर घेण्याची INDI आघाडीला उभारी येईल, पण यात अरविंद केजरीवाल, अखिलेश यादव आणि ममता बॅनर्जी यांचा मुख्य अडथळा यांना पार करावा लागेल. कारण अरविंद केजरीवाल हे दिल्लीतल्या 6 जागा आणि पंजाब मधल्या 13 जागा यावर प्रबळ आहेत. अखिलेश यादव यांनी जरी उत्तर प्रदेशात भाजपला “80 हराओ” अशी घोषणा दिली असली, तरी त्या 80 हराओमध्ये ते काँग्रेसला कितपत “सामील” करून घेतील, याविषयी दाट शंका आहे. अखिलेश यादव मध्य प्रदेश मधला बदला उत्तर प्रदेशात घेण्याची दाट शक्यता बोलून दाखवली जाते.
ममता बॅनर्जींच्या पश्चिम बंगालमध्ये 42 पैकी किती जागा त्या काँग्रेसला सोडतात??, हा प्रश्नच आहे. कारण ममता बॅनर्जींची स्वतःच्या पक्षाची ताकद एवढी आहे, की त्यांना काँग्रेसची गरज नाही आणि काँग्रेस बाकी कोणत्याही पक्षाच्या आधाराशिवाय पश्चिम बंगालमध्ये स्वबळावर उभी राहू शकत नाही.
त्यामुळे केजरीवाल, अखिलेश यादव आणि ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसला आपापल्या राज्यांमध्ये हात दिला तर आणि तरच INDI आघाडीतले 300 जागांपर्यंतचे भाजपला एकास एक टक्कर देण्याचे मनसूबे यशस्वी होण्याची शक्यता आहे.
शिवाय त्यामध्ये तामिळनाडू सारख्या मोठ्या राज्यातून आणि केरळ सारख्या छोट्या राज्यातूनही अडथळे येण्याची शक्यता आहे. कारण तामिळनाडूतल्या 39 जागांपैकी फक्त 4 ते 5 जागाच मुख्यमंत्री एम. के. स्टालिन काँग्रेसला सोडण्याची शक्यता आहे, तर केरळच्या 13 जागांपैकी एकाही जागेवर डावे पक्ष काँग्रेसला हिंग लावून विचारण्याची शक्यता नाही. उलट तिथे वायनाड मधून राहुल गांधींना पराभूत करण्यासाठी डावे पक्षच वेगळी व्यूहरचना करण्याच्या बेतात असल्याची बातमी आहे.
काँग्रेसचे पापड मोडण्याची शक्यता
अशा स्थितीत भाजपशी तब्बल 400 जागांवर एकाच एक टक्कर घेण्याची INDI आघाडीतल्या नेत्यांनी कितीही मनसुबे रचले, तरी ते प्रत्यक्षात उतरण्यासाठी फारच “पापड लाटावे” लागणार आहे आणि त्यात अरविंद केजरीवाल, अखिलेश यादव ममता बॅनर्जी आणि एम. के. स्टालिन हे काँग्रेसचा “पापड मोडण्याची” शक्यता आहे!!
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App