विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : INDI allianceहरियाणा मधला काँग्रेसचा अनपेक्षित पराभव काँग्रेसला धक्का देऊन गेलाच, पण त्या पाठोपाठ मित्र पक्षांनी देखील काँग्रेसला महाराष्ट्र बरोबर उत्तर प्रदेशातही झटका दिला.
हरियाणा काँग्रेसला भाजपकडून अनपेक्षित पराभवाचा सामना करावा लागला. काँग्रेसची स्थिती चांगली असताना केवळ पक्षाच्या नेत्यांच्या अहंकारामुळे काँग्रेसला हाती आलेली बाजी गमवावी लागली. पण हरियाणातला धक्का त्या राज्यापुरता मर्यादित राहिला नाही. तो महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशात येऊन पोहोचला. INDI alliance
महाराष्ट्रात उद्धव ठाकरे आणि शरद पवारांनी काँग्रेसला वाकविले. त्या पक्षाला 85 च्या फॉर्म्युलावर कबुली देणे भाग पाडले. आता काँग्रेसचे नेते अस्वस्थ होऊन 100 गाठण्याचा कसाबसा प्रयत्न करत आहेत. परंतु ठाकरे आणि पवारांनी पक्षाला वाकविले ही वस्तुस्थिती मात्र त्यातून बदलणार नाही.
महाराष्ट्रापाठोपाठ उत्तर प्रदेशात अखिलेश यादव यांनी काँग्रेसला वाकविले. त्यांनी राज्यातल्या 10 विधानसभा पोटनिवडणुकांमध्ये समाजवादी पार्टीचे परस्पर उमेदवार जाहीर करून टाकले. त्यांनी काँग्रेसला 2 जागांची ऑफर दिली होती. परंतु, ती ऑफर स्वीकारणे काँग्रेसला फार कठीण गेले. त्याऐवजी काँग्रेसने संपूर्ण निवडणुकीतच माघार घेणे पसंत केले. उत्तर प्रदेशातल्या पोटनिवडणुकीत 10 पैकी एकाही जागेवर काँग्रेसचा उमेदवार उभा राहणार नाही. हा निर्णय पक्षाने जाहीर करून टाकला.
हरियाणात काँग्रेसने भाजपचा पराभव करून सत्ता खेचून आणली असती, तर “इंडी” आघाडी त्या पक्षाची दादागिरी वाढली असती. प्रादेशिक पक्षांना काँग्रेसला झुकते माप देणे भाग पडले असते, पण हरियाणातला पराभवाचा परिणाम काँग्रेसला महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशात झटका देऊन गेला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App