एकीकडे मोदींची तिसऱ्या टर्मची तयारी; पण चंद्राबाबू + नितीशला पटवण्याची पवार + अखिलेश + ममता यांच्यापैकी नेमकी कोणावर जबाबदारी??

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींची तिसऱ्या टर्मची तयारी सुरू झाली आहे पण दुसरीकडे अजूनही “इंडी” आघाडीला आपण सत्तेवर येऊ शकतो, अशी आशा वाटत असल्याने चंद्राबाबू आणि नितीश कुमार यांना पटवण्याची जबाबदारी वेगवेगळ्या नेत्यांवर काँग्रेसने टाकल्याची बातमी समोर आली आहे. पण त्या बातमीतही मोठी विसंगती आहे.INDI alliance in confusion, who will talk to Chandra babu and nitish kumar??



राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीए आघाडीच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब करण्यात आले. संसदेच्या केंद्रीय कक्षात झालेल्या बैठकीला चंद्राबाबू नायडू नितीश कुमार यांच्यासह एकनाथ शिंदे, अजित पवार आणि बाकीचे महत्व पक्ष नेते उपस्थित होते. सगळ्यांनी एकमताने मोदींची नेतेपदी निवड केली. या निवडीनंतर मोदींनी पंतप्रधान पदाची शपथ घेण्यापूर्वी ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची या सगळ्या नेत्यांच्या घरी जाऊन भेट घेतली. त्यांचे आशीर्वाद घेतले.

एकीकडे मोदींची तिसऱ्या टर्मची अशी तयारी सुरू झालेली असताना दुसरीकडे “इंडी” गाडीतून वेगळीच बातमी फुटली. आता म्हणे, चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांना पटवून “इंडी” आघाडीत आणण्याची जबाबदारी काँग्रेसने ममता बॅनर्जीवर टाकली आहे. यासाठीच त्यांचे भाचे अभिषेक बॅनर्जी दिल्ली दौरे करून वेगवेगळ्या नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. त्यांनी अखिलेश यादव यांची भेट घेतली. त्यानंतर ते मुंबईत उद्धव ठाकरेंची भेट घेऊन गेले. आता दस्तुरखुद्द ममता बॅनर्जी चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांना पटवण्याच्या बेतात आहेत, अशी बातमी समोर आली आहे.

पण त्यापूर्वी हीच जबाबदारी काँग्रेसने शरद पवारांवर सोपवल्याची बातमी आली होती. त्यांच्या पाठोपाठ अखिलेश यादव यांचे देखील नाव चंद्राबाबू आणि नितीश कुमार यांना पटवण्यासाठी समोर आले होते. त्यामुळे चंद्रबाबू आणि नितीश कुमार यांना पटवण्यासाठी काँग्रेसने नेमकी जबाबदारी सोपवली तरी कोणावर?? पवारांवर, अखिलेश यादवांवर की ममता बॅनर्जींवर??, हा सवाल तयार झाला. यापैकी पवारांनी सुरुवातीलाच हात झटकून टाकले. अखिलेश यादव काही बोलले नाहीत. ममता बॅनर्जींनी आपला भाचा ऍक्टिव्ह केला आता त्याची फळे केव्हा, कशी मिळतील??, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

INDI alliance in confusion, who will talk to Chandra babu and nitish kumar??

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात