सलग तिसऱ्यांदा शपथ घेण्यापूर्वी मोदी पोहोचले अडवाणी, मुरली मनोहर जोशींच्या घरी आशीर्वाद घेण्यासाठी!!

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : पंतप्रधानपदाची सलग तिसऱ्यांदा शपथ घेण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पोहोचले लालकृष्ण आडवाणी आणि मुरली मनोहर जोशींच्या घरी आशीर्वाद घेण्यासाठी!!Modi reaches Advani, Murali Manohar Joshi’s house to take blessings before taking oath for the third time in a row!!



नरेंद्र मोदींची आज राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीएच्या नेतेपदी निवड करण्यात आली. त्यामुळे ते पंतप्रधान पदाची शपथ घेणार हे निश्चित झाले. मात्र त्यापूर्वी पक्षातल्या ज्येष्ठ नेत्यांचे आशीर्वाद घेण्याची परंपरा पाळत नरेंद्र मोदींनी आज लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी आणि माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या घरी जाऊन त्यांचे आशीर्वाद घेतले.

राष्ट्रीय लोकशाही आघाडी स्थापन करण्यात अटल बिहारी वाजपेयी यांच्या बरोबरीने लालकृष्ण आडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांचीही मोलाचे योगदान होते याची आठवण मोदींनी ठेवली. 2014 आणि 2019 ही सरकारी चालवताना पंतप्रधान नरेंद्र मोदींना भाजपचे बहुमताचे बळ होते. परंतु, आता मात्र भाजपकडे स्वतःचे बहुमताचे बळ नाही. त्या पार्श्वभूमीवर मोदींनी लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी त्याचबरोबर माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या घरी जाऊन त्यांचे आशीर्वाद घेणे याला विशेष महत्त्व आहे

Modi reaches Advani, Murali Manohar Joshi’s house to take blessings before taking oath for the third time in a row!!

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात