वत्तसंस्था
नवी दिल्ली : उपराष्ट्रपती एम. व्यंकया नायडू आज नवी दिल्लीत खादी समवेत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या डिजीटल प्रश्न मंजुषेचा प्रारंभ करतील. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी केव्हीआयसी अर्थात खादी आणि ग्रामोद्योग आयोगाने ही प्रश्न मंजुषा तयार केली आहे. Independence @ 75: Amritmahotsav of Independence: Khadi India quiz inaugurated by Vice President; 21 winners per day and a prize of 80 thousand
उपराष्ट्रपती खादी इंडिया प्रश्न मंजुषेचा उद्या करणार प्रारंभ 🔗https://t.co/585XNb10iR 31ऑगस्ट 2021 ते 14 सप्टेंबर 2021 असे पंधरा दिवस ही प्रश्न मंजुषा सुरु राहणार दर दिवशी विजेत्यांना खादी इंडियाची एकूण 80,000 रुपये मूल्याची ई कुपन्स दिली जाणार 📕https://t.co/EOKF0pm4Po pic.twitter.com/lVgeryjzut — PIB in Maharashtra 🇮🇳 (@PIBMumbai) August 30, 2021
उपराष्ट्रपती खादी इंडिया प्रश्न मंजुषेचा उद्या करणार प्रारंभ
🔗https://t.co/585XNb10iR
31ऑगस्ट 2021 ते 14 सप्टेंबर 2021 असे पंधरा दिवस ही प्रश्न मंजुषा सुरु राहणार
दर दिवशी विजेत्यांना खादी इंडियाची एकूण 80,000 रुपये मूल्याची ई कुपन्स दिली जाणार
📕https://t.co/EOKF0pm4Po pic.twitter.com/lVgeryjzut
— PIB in Maharashtra 🇮🇳 (@PIBMumbai) August 30, 2021
भारताचा स्वातंत्र्य लढा, स्वातंत्र्य सैनिकांचे समर्पण आणि त्याग तसेच स्वातंत्र्यपूर्व काळापासून खादीची परंपरा यांच्याशी जन सामान्यांची नाळ जोडण्याचा यामागचा उद्देश आहे. भारताचा स्वातंत्र्य लढा, स्वदेशी चळवळीतली खादीची भूमिका आणि भारतीय राजकीय पटलासंदर्भातल्या प्रश्नांचा या प्रश्न मंजुषेत समावेश आहे.
31ऑगस्ट 2021 ते 14 सप्टेंबर 2021 असे पंधरा दिवस ही प्रश्न मंजुषा सुरु राहणार असून केव्हीआयसीच्या सर्व डिजिटल मंचावरून दररोज 5 प्रश्न मांडण्यात येतील. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी https://www.kviconline.gov.in/kvicquiz/ ला भेट द्या. सहभागी व्यक्तींनी 100 सेकंदात सर्व पाच प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. दररोज सकाळी 11 वाजता प्रश्नमंजुषा सुरु होणार असून पुढचे 12 तास म्हणजेच रात्री 11 वाजेपर्यंत हे प्रश्न पाहता येणार आहेत.
कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त अचूक उत्तरे देणाऱ्या सहभागीला त्या दिवसाचा विजेता म्हणून जाहीर केले जाईल. दर दिवशी 21 विजेत्यांची (प्रथम पारितोषिक, 10 द्वितीय पारितोषिके आणि तिसऱ्या क्रमांकाची दहा पारितोषिके) नावे जाहीर करण्यात येतील. दर दिवशी विजेत्यांना खादी इंडियाची एकूण 80,000 रुपये मूल्याची ई-कुपन्स दिली जातील. केव्हीआयसीच्या www.khadiindia.gov.in. या ऑनलाईन पोर्टलवर त्याचा वापर करता येईल.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App