विशेष प्रतिनिधी
मुंबई – कोरोनाच्या काळात पीछेहाट झालेली भारतीय अर्थव्यवस्था आता पूर्ववत होण्याच्या बेतात आहे. मात्र ती पूर्ण क्षमतेनुसार वाढण्यासाठी खासगी भांडवली गुंतवणुकीचा प्रवाह वेगाने सुरु झाला पाहिजे,’’ असे मत रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी व्यक्त केले आहे.Increase in Private investment is necessary say Mr. Das
कायमस्वरूपी टिकणारा आणि स्थिर विकास हवा असल्यास खासगी गुंतवणुकीला तरणोपाय नाही, यावरही दास यांनी भर दिला. ‘कोरोनाकाळात अर्थव्यवस्था वाढीची गती मंदावली होती. आता कोरोना संपत आल्यावर तिच्यात अजूनही वेगाने आगेकूच करण्याची क्षमता आहे.
मात्र खासगी गुंतवणुक हेच त्यावरील उत्तर आहे. अनेक अर्थतज्ज्ञांनी यावर्षात भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीच्या वेगाचा अंदाज दहा टक्क्यांपासून साडेआठ टक्क्यांपर्यंत कमी केला आहे. मात्र रिझर्व्ह बँक आपल्या साडेनऊ टक्क्यांच्या अंदाजावर अजूनही कायम आहे.
गुंतवणुकीचे खरे चक्र साधारण पुढील आर्थिक वर्षापासून सुरु होईल. मात्र तेव्हा बँकांनीदेखील गुंतवणुक करण्यासाठी सज्ज राहावे,’’ असे आवाहनही त्यांनी केले.खरे पाहता सन २०१३ पासून बाजारातून खासगी भांडवली गुंतवणुक रोडावली आहे.
पण ती पुढील आर्थिक वर्षाच्या मध्यापासून सुरु होण्याची अपेक्षा असल्याचेही ते म्हणाले. बँकांचा ताळेबंद सुधारत असून त्यांची बुडीत-थकीत कर्जेही कमी झाली आहेत. तरीही त्यांची भांडवली व्यवस्थापन प्रक्रिया सुधारण्याची गरज असल्याचे त्यांनी दाखवून दिले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App