मान्सून केरळमध्ये दाखल, महाराष्ट्रात 12 ते 15 जूनदरम्यान बरसणार, राज्यात मान्सूनपूर्व पावसाचीही शक्यता

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : रेमल चक्रीवादळावर स्वार होऊन अालेल्या दक्षिण-पश्चिमेकडील मान्सून केरळ किनारपट्टी आणि ईशान्येकडील काही भागात दाखल झाला. दोन्ही बाजूंनी एकाच वेळी मान्सूनचे आगमन होणे दुर्मिळ मानले जाते. हवामानतज्ज्ञांच्या मते, रविवारी बंगाल आणि बांगलादेशात धडकलेल्या रेमल चक्रीवादळाने मान्सूनचा प्रवाह बंगालच्या उपसागराकडे खेचला होता. ईशान्येत मान्सून लवकर येण्याचे हे एक कारण असू शकते. यंदा मान्सून केरळमध्ये अंदाजापेक्षा एक दिवस आधी आणि १ जूनच्या नियोजित तारखेच्या दोन दिवस आधी पोहोचला आहे. दरम्यान महाराष्ट्रात मान्सूनच्या वाटचालीला पोषक वातावरण असल्याने राज्यात तो १२ ते १५ जूनदरम्यान दाखल होण्याची चिन्हे आहेत. तसेच १ ते ३ जूनदरम्यान २९ जिल्ह्यांत मान्सूनपूर्व पाऊस कोसळणार आहे.In the Pune Porsche accident case, the father of the accused also changed the blood samples of two of the boy’s friends; Investigation started



दिल्लीत उष्माघाताने मृत्यू

दिल्लीतील राम मनोहर लोहिया रुग्णालयात ४० वर्षीय व्यक्तीचा उष्माघाताने मृत्यू झाला. तो बिहारमधील दरभंगा येथील होता. जेव्हा शेजाऱ्यांनी त्याला हॉस्पिटलमध्ये नेले तेव्हा त्याच्या शरीराचे तापमान १०७ डिग्री फॅरेनहाइट होते म्हणजे सरासरीपेक्षा १० डिग्री जास्त आहे.

आज मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात उष्णतेची लाट

उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, धुळे, भुसावळसह मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, परभणी, बीड, जालना, लातूर या जिल्ह्यांत उष्णतासदृश्य लाट राहणार असून रात्री उकाडा वाढणार असल्याचा अंदाज पुणे हवामान विभागातील निवृत्त शास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तवला आहे. राज्यात मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, गोंदिया, गडचिरोली, नागपूर, वर्धा, यवतमाळ, बुलडाणा, वाशिम, भंडारा, छत्रपती संभाजीनगर, परभणी, बीड, हिंगोली, धाराशिव, जालना, लातूर या जिल्ह्यांत १ ते ३ जूनपर्यंत मान्सूनपूर्व पावसाचा अंदाज आहे.

In the Pune Porsche accident case, the father of the accused also changed the blood samples of two of the boy’s friends; Investigation started

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात