कोरोनाच्या काळात नागरिकांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने फॅमिली पेन्शनचे नियम आणखी सोपे आणि सुटसुटीत करण्यात आले आहेत. कोरोना महामारीमुळे केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे.In the Corona period, the rules of family pension were simple for the comfort of the citizens
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : कोरोनाच्या काळात नागरिकांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने फॅमिली पेन्शनचे नियम आणखी सोपे आणि सुटसुटीत करण्यात आले आहेत. कोरोना महामारीमुळे केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे.
केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांच्यानुसार जर फॅमिली पेन्शनचा क्लेम आला तर मृत्यू दाखला पाहून कुटुंबातील योग्य सदस्याला लगेचच पेन्शन लागू केली जाणार आहे.
यासाठी कागदोपत्री कार्यवाहीची वाट पाहिली जाणार नाही. जर पेन्शनराचा मृत्यू कोरोना किंवा अन्य कारणाने झाला तर दोन्ही प्रकरणी त्याच्या परिवाराच्या सदस्याला पेन्शन लागू करण्यात येणार आहे.
जर कोणत्याही सरकारी कर्मचाऱ्याचा सेवेदरम्यान मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबाला लगेचच पेन्शन लागू केली जाणार आहे. ही पेन्शन कागदपत्र पोहोचताच जारी केली जाणार आहे.
एवढेच नाही तर प्रोव्हिजनल पेन्शनची मुदतदेखील वाढवून 1 वर्षे केली आहे. यामुळे ज्या तारखेला कर्मचारी रिटायर होतील त्या दिवसापासून 1 वर्षापर्यंत त्यांना प्रोव्हिजनल पेन्शन मिळत राहणार आहे. 1972 च्या नियम 64 नुसार ही पेन्शन याआधी 6 महिनेच दिली जात होती.
आता कोरोना काळामुळे मुदत वाढविली आहे. प्रोव्हिजनल पेन्शनची सोय ही आधीपासूनच आहे. ही पेन्शन शेवटच्या पगाराच्या रकमेवर ठरविली जाते. मात्र, नंतरची पेन्शन आणि यामध्ये जास्त अंतर नसते.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App