धार्मिक पर्यटनाच्या बाबतीत अयोध्या मक्का आणि व्हॅटिकन सिटीला मागे टाकणार

अयोध्या उत्तर प्रदेशच्या अर्थव्यवस्थेत सुपर बूस्टर म्हणून काम करणार


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : मक्का हे इस्लाम धर्माचे सर्वात पवित्र क्षेत्र आणि व्हॅटिकन सिटी ख्रिश्चन धर्माचे महत्तवाचे केंद्र आहे. ही जगभरातील प्रसिद्धि धार्मिक पर्यटन केंद्रं मानली जातात. जागतिक अर्थव्यवस्थेच्या विविध पैलूंवर भविष्यातील शक्यता मांडणाऱ्या एजन्सींनी म्हटले आहे की 22 जानेवारी रोजी उत्तर प्रदेशातील अयोध्येतील राम मंदिरात भगवान रामाचा अभिषेक झाल्यानंतर अयोध्येला धार्मिक पर्यटनाच्या क्षेत्रात एक प्रमुख स्थान मिळेल.In terms of religious tourism Ayodhya is Mecca and Vatican City is in demand



त्यानुसार, अयोध्या उत्तर प्रदेशच्या अर्थव्यवस्थेत सुपर बूस्टर म्हणून काम करेल. यामुळे उत्तर प्रदेशला वन ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी बनवण्याच्या मुख्यमंत्री योगींच्या संकल्पात अयोध्या मैलाचा दगड ठरेल. अयोध्येत नव्याने बांधलेल्या राम मंदिराला भेट देणाऱ्या भाविकांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने महसूलात झपाट्याने वाढ होईल, असा उत्तर प्रदेश सरकारचा दावा आहे.

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) च्या अहवालानुसार, आगामी आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये उत्तर प्रदेशमध्ये 25 हजार कोटी रुपयांचे कर संकलन अपेक्षित आहे. यामध्ये अयोध्येतील महसुलाचा वाटा सर्वात महत्त्वाचा असेल. त्याचप्रमाणे स्टॉक रिसर्च फर्म जेफरीजच्या अहवालातही दावा करण्यात आला आहे की, पुढील एक वर्षात ५ कोटी लोक अयोध्येत येण्याची शक्यता आहे. असे झाल्यास जगातील धार्मिक पर्यटनाची प्रमुख केंद्रे असलेली व्हॅटिकन सिटी आणि मक्काही अयोध्येचे मागे राहतील.

In terms of religious tourism Ayodhya is Mecca and Vatican City is in demand

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात