
विशेष प्रतिनिधी
वायनाड : केरळच्या वायनाडमध्ये काँग्रेसला आणखी एक धक्का बसला असून, काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष पी. व्ही. बालचंद्रन यांनी मंगळवारी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. बहुसंख्याक व अल्पसंख्याक दोन्ही समुदायांपासून काँग्रेस दूर जात आहे.In Rahul Gandhi’s constituency itself, the Congress was pushed, another leader left the party
राज्याचे नेतृत्व लोकांना प्रभावित करणाऱ्या मुद्द्यांवर स्पष्ट राजकीय भूमिका घेण्यास सक्षम नाही. पक्ष आता काँग्रेस कार्यकर्त्यांच्या भावनेनुसार काम करू शकत नाही, असे त्यांनी म्हटले आहे.
केरळ प्रदेश काँग्रेस समितीच्या कार्यकारी समितीचे सदस्य असलेल्या बालचंद्रन यांनी म्हटले आहे की, काँग्रेससमवेत माझे तब्बल ५२ वर्षांचे संबंध आहेत. ते आता संपुष्टात आले आहेत. कारण देशातील सर्वांत जुना पक्ष असलेला कॉँग्रेस भाजपची घोडदौड रोखण्यात यशस्वी ठरला नसल्याबद्दल ते नाराज आहेत.
वायनाडमध्ये काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी राजीनामे दिलेले आहेत. माजी आ. के. सी. रोसाकुट्टी, प्रदेश सचिव एम. एस. विश्वनाथन व डीसीसी सरचिटणीस अनिलकुमार यांनी एप्रिलमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी पक्ष सोडला होता. त्यात आता बालचंद्रन यांचा राजीनामा पक्षाला मोठा धक्का मानला जात आहे.
In Rahul Gandhi’s constituency itself, the Congress was pushed, another leader left the party
महत्त्वाच्या बातम्या
- टाटा ग्रुपमध्ये नोकरीची संधी, विविध कंपन्यांमध्ये ४५६४ रिक्त जागा लवकरच भरणार
- नारायण राणे यांनी सिध्द केले कोकणवरील वर्चस्व, वेंगुर्ला उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत कॉँग्रेस- राष्ट्रवादी- शिवसेना आघाडीला दणका
- सरकारवर टीका करणे खूप सोपे असते पण…गेल्या शंभर वर्षांपासूनच्या आरोग्यसेवेसाठी सध्याच्या राज्यकर्त्यांना दोषी ठरविणे चुकीचे, सर्वोच्च न्यायालयाकडून ऑक्सिजन कमतरतेवर तपासाचे आदेश देण्यास नकार
- श्रीनगर मध्ये दहशतवादी हल्ला, 3 नागरिकांची हत्या