या दहशतावाद्यांनी अगोदर रेकी देखील केली होती.
विशेष प्रतिनिधी
चंडीगढ : पंजाब पोलिसांनी टार्गेट किलिंग करून राज्यातील वातावरण बिघडवण्याचा कट रचणाऱ्या एका दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश केला आणि खलिस्तान लिबरेशन फोर्स (KLF) च्या चार दहशतवाद्यांना शस्त्रांसह अटक केली. हे चौघेही पाकिस्तानात दडलेल्या केएलएफ दहशतवादी हरविंदर सिंग रिंडा यांच्या जवळचे आहेत. In Punjab the conspiracy to kill big people failed four terrorists arrested with weapons
अमेरिका स्थित इंटरनॅशनल शीख युथ फेडरेशनचे (ISYF) दहशतवादी आणि हरप्रीत सिंह उर्फ हॅप्पी ऑपरेट करत होता. त्यांच्या निशाण्यावर पंजाबमधील काही बडे व्यक्ती होते आणि १५ लाख रुपयांमध्ये हत्येचा सौदा झाला होता.
विक्रमजीत सिंग उर्फ राजा बैंस रा. बटाला, बावा सिंग रा. लुधर (अमृतसर), गुरकिरपाल सिंग उर्फ गगन रंधावा आणि अमानत गिल दोघेही अमृतसरचे रहिवासी अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी आरोपींकडून .32 बोअरचे पिस्तूल आणि 10 काडतुसे जप्त केली आहेत. डीजीपी गौरव यादव यांनी सांगितले की, आरोपींविरुद्ध यूएपीए आणि शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रिंडा आणि हॅप्पी यांनी राज्यातील काही प्रमुख व्यक्तींच्या सुनियोजित हत्येचा कट रचल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यानंतर राज्य स्पेशल ऑपरेशन सेल मोहालीच्या पथकाने विशेष कारवाई केली. यानंतर विक्रमजीत उर्फ राजा बैंस आणि बावा सिंग यांना ताब्यात घेण्यात आले. हॅपीने टार्गेट किलिंगसाठी विक्रमजीतसोबत १५ लाख रुपयांचा सौदा केल्याचे तपासात समोर आले आहे. ही घटना घडवून आणण्यासाठी विक्रमजीतने सप्टेंबर २०२३ च्या शेवटच्या आठवड्यात रेकीही केली होती.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App