विशेष प्रतिनिधी
चंदीगड : पंजाबमध्ये पोलीसच हैवान बनले आहेत. एका बलात्कार पीडित महिलेने बलात्काराची तक्रार मागे घ्यावी यासाठी पोलीस ठाण्यात तिला निर्वस्त्र करून गुप्तांगाला वीजेचे शॉक दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.In Punjab police stripped the woman and gave her an electric shock to withdraw her rape complaint
पीडिताने म्हटले की, सीआयए स्टाफ-१ च्या बरखास्त एएसआयविरोधातील बलात्काराची तक्रार मागे घेण्यासाठी अरनीवाला पोलिसांनी माझ्यावर दबाब आणला होता. त्याला नकार दिल्यावर माझा छळ केला गेला. पोलीस ठाण्यावर गेल्यावर पोलीस ठाण्याच्या प्रमुखाने तडजोडीसाठी दबाव आणला.
आरोपीच्या कुटुंबाकडून २०-२५ लाख रुपये मिळवून देण्याचे आशसन दिले. मी ते नाकारल्यावर मला ड्रगचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. मला निर्वस्त्र करून गुप्तांगाला करंटही दिले गेले. त्याचा व्हिडीओही बनवला गेला. कोऱ्या कागदांवर सह्या करून घेतल्या व त्यांना हवे तसे म्हणणे लिहून घेतले गेले.
अरनीवाला पोलीस ठाण्यात बरखास्त एएसआयविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करणारी पीडिता आणि साक्षीदाराला अवैधरीत्या ताब्यात ठेवून त्यांचा छळ केल्याच्या आरोपावरून ठाण्याचा अधिकारी मनजीत सिंग याला निलंबित करण्यात आले. याचबरोबर फिरोजपूरच्या एसएसपीने पीडितेला निर्वस्त्र करून गुप्तांगाला करंट लावल्याच्या आरोपाच्या चौकशीचेही आदेश दिले गेले आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App