विशेष प्रतिनिधी
चंदीगड : पंजाबमध्ये भारतीय जनता पक्षाने विधानसभा निवडणुकीसाठी रणनिती आखाली आहे. हिंदूबहुल असलेल्या ४५ जागांवर भाजपाने लक्ष केंद्रीत केले आहे. पंजाबमध्ये विधानसभेच्या ११७ जागा आहेत.In Punjab, BJP’s strategy will focus on 45 Hindu-majority seats
अकाली दलाशी तुटलेली युती, शेतकरी आंदोलनामुळे निर्माण झालेली स्थिती यातूनही भाजपाला पंजाबमध्ये सत्तेपर्यंत जाण्याचा मार्ग सापडला आहे. यासाठी ही रणनिती आखण्यात आली आहे. निवडणुकीसाठी ही रणनीती जिल्हा नेतृत्वाला समजावून देण्यात आली आहे. राज्य भाजप नेतृत्वाने कार्यकर्त्यांना त्यासाठी निर्देश दिले आहेत.
भाजपाचे नेतृत्व गेल्या तीन महिन्यांपासून पंजाबमध्ये निवडणुकीची रणनिती आखाली आहे. यामध्ये विधानसभेच्या अशा ४५ जागा शोधण्यात आल्या आहेत की जेथे हिंदूबहुल आहेत. सुमारे ६० टक्यांपेक्षा जास्त हिंदू लोकसंख्या आहे. या जागांपैकी 23 जागा अशा आहेत जेथे भाजपाने गेल्या दोन दशकांपासून अकाली दलासोबत युती करून निवडणूक लढविली होती.
त्यापैकी काही जागांवर भारतीय जनसंघाच्या काळात निवडणुका लढविल्या होत्या. मात्र, अकाली दलाशी युती झाल्याने या जागा पक्षाला सोडाव्या लागल्या. यामध्ये रोपार, जलालाबाद, पटियाला (शहर), भटिंडा (शहर) यांचा समावेश आहे. काही विधानसभा मतदारसंघ असे आहेत की ज्या ठिकाणी पक्षाने कधीही निवडणूक लढविली नाही. मात्र, पक्ष संघटनेचा पाया मजबूत आहे. डेराबस्सी, खरार आणि मोहाली, रोपर, बुधलाडा आणि भटिंडा यांचा यामध्ये समावेश आहे.
कृषि कायद्यांना विरोध करणाºया शेतकरी संघटनांची भूमिका अनेकांना पसंत नाही. अशा स्वयंसेवी संस्था आणि सामाजिक संघटनांसोबत कार्यकर्त्यांनी काम करावे असेही पक्षाच्या नेतृत्वाने म्हटले आहे.
भाजपचे प्रदेश सरचिटणीस सुभाष शर्मा म्हणाले की सर्व ११७ जागा लढविल्या जाणार आहेत. ग्रामीण भागात कृषि कायद्यांमुळे भाजपाला विरोध असल्याचा गैरसमज आहे. ग्रामीण भागातूनही आम्हाला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App