वृत्तसंस्था
कोहिमा: नागालँड प्रदेश भाजपतर्फे राज्यात फ्रंटलाइन वर्कर यांच्यासाठी एक वेळचे भोजन देण्याची योजना 15 मे पासून सुरु केली जाणार आहे. In Nagaland One Time Lunch will be Given to Front line Workers by State Bjp
त्याअंतर्गत कोहिमा येथे पक्षाकडून एक वेळचे जेवण दिले जाईल. नागालँडच्या भाजपा एसटी मोर्चाद्वारे हा उपक्रम राबविण्यात आला आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष वॅन्फोंग कोन्याक यांनी सांगितले की कोहिमा येथील एक वेळच्या जेवणाची सुविधा 15 मेपासून सुरू केली जाईल, जी लॉकडाऊन संपेपर्यंत चालू राहील.
ते म्हणाले, नागालँड सरकारने 14 ते 21 मे दरम्यान लॉकडाऊन जाहीर केला आहे. हा कार्यक्रम कोहिमाच्या वाहतूक पोलिसांकडून सुरू केला जाईल. त्यानंतर सफाई कर्मचारी आणि आरोग्य कर्मचारी समाविष्ट केले जातील. कोन्याक यांनी यावर जोर दिला की कोविड प्रकरणात वाढ झाल्यामुळे कामगारांची कर्तव्य वाढली आहेत आणि या आव्हानात्मक काळामध्ये ते पूर्ण धैर्याने आणि समर्पण वृत्तीने पार पाडत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App