महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे नुसतेच दावे चालले आहेत की एकरकमी चेक देऊन आंतरराष्ट्रीय पातळीवरून कोराना लस घेण्यास तयार आहोत. परंतु, हरियाणा सरकारने स्फुटनिक व्ही या रशियन कोरोना प्रतिबंधक लसीचे सहा कोटी डोस घेण्यासाठीचा करारही करून टाकला आहे.In Maharashtra, they say they are ready for a one-time purchase and the Haryana government will buy six crore doses of Sputnik V vaccine directly.
विशेष प्रतिनिधी
चंडीगड: महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे नुसतेच दावे चालले आहेत की एकरकमी चेक देऊन आंतरराष्ट्रीय पातळीवरून कोराना लस घेण्यास तयार आहोत. परंतु, हरियाणा सरकारने स्फुटनिक व्ही या रशियन कोरोना प्रतिबंधक लसीचे सहा कोटी डोस घेण्यासाठीचा करारही करून टाकला आहे.
माल्टा येथील एक कंपनी 6 कोटी लशींच्या डोसचा पुरवठा करण्यास तयार असल्याचं हरयाणा सरकारने सांगितलं आहे. या कंपनीकडून रशियातील स्फुटनिक व्ही या लसीची पूर्तता करण्याचे आश्वासन दिले आहे.
हरयाणा सरकारला या लशींचे डोस मिळाल्यास हरयाणा हे देशातील काही ठराविक राज्यांमध्ये गणले जाईल, ज्या राज्यांना थेट परदेशातून लस मिळविण्यात यश आले आहे.
पंजाबसह अनेक राज्यांनी जगभरातील काही देशांशी कोरोना लसीबाबत संपर्क साधला होता. मात्र, फायजर, मॉडर्ना यांसारख्या कंपन्यांनी राज्यांना थेट कोरोना लशींचे डोस देण्यास नकार दिला होता. लशींच्या डोससाठी परदेशाशी थेट व्यवहार करणारे हरियाणा हे देशातील एकमेव राज्य आहे.
कारण, इतर राज्यांना थेट लस देण्यास नकार देत केंद्र सरकारच्या माध्यमातून लशींचे डोस घेण्यास सांगण्यात आले आहे. फार्मा रेगुलेटरी सर्विसेज लिमिटेड, ज्याचे मुख्यालय यूरोपीय राष्ट्र युएसमध्ये आहे,
त्यांनी लशींच्या पुरवठ्याबाबत आग्रही भूमिका दर्शवली आहे. मात्र, अद्याप करारासाठी बोली लावण्यात आली नाही.हरयाणा राज्य सरकारने 26 मे रोजी एक ग्लोबल टेंडर जारी केले होते. त्यामध्ये, लशींच्या पुरवठ्याची मागणी केली होती.
शुक्रवारी ही टेंडर नोटीस बंद करण्यात आली आहे. दरम्यान, माल्टा कंपनीने वेळेत हे टेंडर भरले नाही. तरीही, कंपनीने लशींच्या पुरवठ्याची हमी घेणार असल्याचं सांगितल्यामुळे हरयाणा राज्य सरकारनेही मुदत संपल्यानंतर कंपनीकडून लस विकत घेण्यास तयारी दर्शवली आहे.
दरम्यान, रशियाच्या या लशीच्या एका डोसची किंमत 1,120 रुपये एवढी असणार आहे. पुढील 30 दिवसांत कंपनीकडून 5 लाख लशींच्या डोसची पूर्तता करण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले आहे.
तर, 20 दिवसाला 10 लाख डोस देण्याचं टार्गेट कंपनीने मान्य केल्याचे हरयाणा सरकारने म्हटलंय.महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे गेल्या अनेक दिवसांपासून कोरोना प्रतिबंधक लस विकत घेण्यासाठी ग्लोबल टेंडर काढणार असल्याचे सांगत आहेत.
त्यासाठी एकरकमी चेक देण्याचीही तयारी असल्याचे म्हणत आहेत. मात्र, महाराष्ट्रसरकारने ग्लोबल टेंडरसाठी घातलेल्या अटींमुळे कोणीही आंतरराष्ट्रीय कंपनी लस पुरविण्यास तयार नाही.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App