प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्रात सत्ताबदल होऊन आठवडा उलटत असताना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीचे बिगुल वाजले आहे. राज्यातील 92 नगर परिषदा आणि 4 नगरपंचायतीमधील सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. येत्या 18 ऑगस्ट रोजी मतदान होणार असून या निवडणूकीची प्रक्रिया 20 जुलैपासून सुरू होणार आहे. याबाबत राज्य निवडणूक आयोगाने निर्देश दिले आहेत. 22 ते 28 जुलैपर्यंत राज्य निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या संकेतस्थळावर उमेदवारांना अर्ज भरता येतील.
मात्र, या निवडणुका ओबीसी आरक्षणासह अथवा ओबीसी आरक्षणाशिवाय होणार आहेत याबाबतचा खुलासा झालेला नाही या संदर्भात शिवसेना भाजप युतीचे फळ शिंदे फडणवीस सरकार नेमका कोणता निर्णय घेते, याकडे लक्ष लागले आहे.
पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, क्लाहूपर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर, अमरावती आणि बुलढाणा या 17 जिल्ह्यातील 92 नगर परिषदा आणि चार नगरपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत.
– अ वर्ग नगरपरिषदा : भुसावळ, बारामती, बार्शी, जालना, बीड, उस्मानाबाद
– ब वर्ग 28 नगरपरिषदा : मनमाड, सिन्नर, येवला, दौंडाईचा – वरवाडे, शिरपूर – वरवाडे, शहादा, अंमळनेर, चाळीसगाव, कोपरगाव, संगमनेर, श्रीरामपूर, चाकण, दौंड, कराड, फलटण, इस्लामपूर, विटा, अक्कलकोट, पंढरपूर, अकलूज, जयसिंगपूर, कन्नड, पैठण, अंबेजोगाई, माजलगाव, परळी-वैजनाथ, अहमदपूर, अंजनगाव- सुर्जी,
– क वर्ग नगरपरिषदा : कुरुंदवाड, मुरगुड, वडगांव, गंगापूर
साताऱ्यात 5 नगरपालिकांच्या निवडणुका
सातारा जिल्ह्यातील पाच नगरपालिकांच्या निवडणुका होणार असून कराड, फलटण, मसवड, रहिमतपूर, वाई या नगरपालिकेचा समावेश आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App