Shinzo Abe : “क्वाड”चे संस्थापक सदस्य, कणखर भारत मित्र!!


जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्यावर हल्लेखोराने जीवघेणा हल्ला केला. त्यांना जाहीर सभेत गोळ्या घातल्या. त्यांची प्रकृती गंभीर आहे.Shinzo Aabe : founder member of QUAD and strong “Bharat Mitra”!!

शिंजो आबे हे जपानमध्ये नजीकच्या भूतकाळात सर्वाधिक काळ सत्तेवर राहिलेले पंतप्रधान ठरले आहेत. आपल्या पंतप्रधानपदाच्या कारकीर्दीत शिंजो आबे यांनी जपानला आर्थिक आणि परराष्ट्र धोरणामध्ये स्वतंत्र दिशा दिलीच, पण भारताच्या दृष्टीने कणखर भारत मित्र म्हणून त्यांची ओळख अधिक ठळक राहिली आहे. 2006, 2014, 2015, 2018 अशा चार वर्षांमध्ये शिंजो यांनी भारताचे दौरे केले होते.

भारताचे पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी या दोन्ही पंतप्रधानांच्या कारकिर्दी शिंजो आबे यांनी जवळून पाहिल्या. 2007 मध्ये भारत ऑस्ट्रेलिया जपान आणि अमेरिका आंतरराष्ट्रीय स्ट्रॅटेजिक समूह क्वाड स्थापन करण्यात शिंजो आबे यांचा महत्त्वाचा वाटा राहिला आहे. त्यांच्याच नेतृत्वाखाली क्वाडची पहिली बैठक झाली होती.भारताबरोबर 2006 ते 2020 अशा 14 वर्षांमध्ये जपानचे संबंध दृढमूल करण्यात त्यांचा मोलाचा वाटा राहिला. याच कालावधीत भारतातल्या अनेक प्रकल्पांना जपानने अर्थसाह्य प्राप्त करून दिले. यामध्ये दिल्ली मेट्रोपासून ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दृष्टीने महत्त्वाकांक्षी प्रकल्प असणाऱ्या मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनचा देखील समावेश आहे. पुण्यातील मुळा मुठा नदी सुधार प्रकल्पाला देखील जपानचेच अर्थसहाय्य आहे. त्याचबरोबर भारत जपान मध्ये आर्थिक संबंध दृढमूळ करण्यासाठी व्यापक आर्थिक करारही शिंजो आबे यांच्याच पंतप्रधान पदाच्या काळात झाले आहेत.

शिंजो आबे यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. जपान मधील नारा शहरामध्ये एका जाहीर सभेत भाषण करत असताना आबे यांच्यावर हल्लेखोराने समोरून गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात ते जखमी झाले असून त्यांना ताबडतोब रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

स्थानिक टीव्हीने दिलेल्या माहितीनुसार एका कार्यक्रमात अबे भाषण करत असताना हल्लेखोराने त्यांच्यावर गोळ्या झाडल्या या हल्ल्यानंतर तिथे उपस्थित गर्दी पूर्णपणे हबकून गेली. परंतु तिथे उपस्थित असणाऱ्या सुरक्षा अधिकाऱ्यांनी आणि पोलिसांनी तातडीने आबे यांना रुग्णालयात हलवले आहे.

– आबे – मोदी घनिष्ठ संबंध

शिंजो आबे आणि भारताचे विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात अतिशय घनिष्ठ मैत्री संबंध आहे. शिंजो आबे यांच्या पंतप्रधानपदाच्या काळात मोदींनी जपानला दोनदा भेट दिली. त्यावेळी त्यांच्यातील वैयक्तिक केमिस्ट्री हा जागतिक राजकारणातल्या चर्चेचा मोठा केंद्रबिंदू बनला होता. त्याचबरोबर भारत – अमेरिका – जपान आणि ऑस्ट्रेलिया हा आंतरराष्ट्रीय राजकारणातला चतुष्कोन क्वाडच्या स्थापनेत आणि ही संघटना वृद्धिंगत करण्यात शिंजो आबे यांचा सर्वाधिक मोलाचा वाटा राहिला आहे. क्वाडच्या बैठकांना ते सर्वाधिक वेळा उपस्थित राहिलेले जपानचे पंतप्रधान ठरले आहेत.

आंतरराष्ट्रीय राजकारणात चीन विरोधात ठाम भूमिका घेऊन जपानसह भारतासारखी आंतरराष्ट्रीय शक्ती जोडून घेऊन क्वाड संघटनेला मजबुती देण्याचे फार महत्त्वाचे काम आबे यांच्या पंतप्रधान पदाच्या काळात झाले आहे.

आबे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच कारकिर्दीत भारताला दोनदा भेट दिली असून त्यापैकी एकदा ते भारताच्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे देखील राहिले आहेत. 2015 मध्ये आपल्या भारत दौऱ्यात शिंजो अभियान आबे यांनी वाराणसीतील काशी विश्वनाथ मंदिराला भेट देऊन दर्शन घेतले होते. त्याचबरोबर वाराणसीतील गंगा आरती समारंभात देखील ते सहभागी झाले होते. पंतप्रधान मोदींच्या नुकत्याच झालेल्या जपान दौऱ्यात शिंजो आबे यांनी त्यांना स्वतःच्या खाजगी निवासस्थानी खास निमंत्रण देऊन त्यांच्याशी चर्चा केली होती. आपल्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे आबे यांनी 2020 मध्ये जपानचे पंतप्रधान पद सोडले. मात्र त्यांची सत्ताधारी नॅशनल डेमोक्रॅटिक पार्टी जपानमध्ये सत्तेवर आहे आणि फुमोदू किशिदा हे त्यांच्या पक्षाचे पंतप्रधान आहेत.

Shinzo Aabe : founder member of QUAD and strong “Bharat Mitra”!!

महत्वाच्या बातम्या 

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती