वृत्तसंस्था
नवी दिल्ली : भारतात आता अनेक गॅझेट्ससाठी एकच चार्जर असावा यावर सहमती बनत आहे. मोबाइल कंपन्या आणि या क्षेत्रातील अन्य कंपन्या यासाठी सहमत झाल्या आहेत. या प्रकरणी माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने माहिती दिली आहे. सचिव रोहित कुमार सिंह यांच्या अध्यक्षतेखालील टास्क फोर्सच्या बैठकीत झालेल्या चर्चेत हा निर्णय घेण्यात आला आहे. देशात इलेक्ट्रॉनिक कॅसेट्समुळे तयार होत असलेल्या ई-वेस्ट वर या निर्णयामुळे परिणामकारक उपायोजना होणार आहे. In India now one country one charger; Agree on Modi government’s policy
वेगवेगळ्या डिवाइससाठी एकाच डिझाईनचा चार्जर ठरवण्यासाठी डिझायनर्स आणि इंजिनिअरची एक टीम बनवली आहे. त्यांच्या सल्ल्यानुसार चार्जर चे डिझाईन ठरवण्यात येईल अर्थात टाइप सी किंवा अन्य चार्जरच्या मुद्यावर निर्णय अद्याप झाला नाही.
माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६६ अ नुसार गुन्हे नोंदवू नका, केंद्रीय गृह मंत्रालयाच्या राज्यांना सूचना
या बैठकीत MAIT, FICCI, CII, IIT कानपूर, IIT (BHU) सह अनेक शैक्षणिक संस्था सोबत पर्यावरण मंत्रालय आणि केंद्र सरकारच्या मंत्रालयातील प्रतिनिधी यांनी सहभाग नोंदवला होता. बैठकीनंतर सर्व प्रतिनिधींनी यावर सहमती दर्शवली. मोबाइल पासून लॅपटॉप पर्यंत एक कॉमन चार्जिंग पोर्ट जारी करायला हवे असे एकमताने ठरले आहे. बैठकीत सहभागी झालेल्या अनेकांनी स्मार्टफोन, लॅपटॉप, आणि अन्य काही गॅझेटसाठी USB Type-C वर सहमती दर्शवली आहे, तर फीचर्स फोनसाठी वेगळे चार्जर असायला हवे, असा सल्ला दिला आहे. या निर्णयानंतर देशात होत असलेल्या ई-वेस्ट मध्ये कमी पाहायला मिळू शकते.
एकाच प्रकारचे चार्जरचा निर्णय सीओपी २६ मध्ये पीएम नरेंद्र मोदी यांनी सुरू केला होता. LiFE (लाइफस्टाइल फॉर एनवायरनमेंट) मिशनच्या दिशेने एक पाऊस टाकले आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबर मध्ये COP26 इवेंटमध्ये पीएम मोदी यांनी जलवायू परिवर्तनवर बोलताना म्हटले होते की, भारत २०७० पर्यंत कार्बन उत्सर्जनला नेट झीरो करण्याचे लक्ष्य मिळवेल. LiFE मिशनची सुरुवात प्रो प्लेनेट पीपल (Pro-Planet People-P3) च्या धर्तीवर सुरू झाली होती.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App