विशेष प्रतिनिधी
पणजी : गोव्यातील विधानसभेच्या ४० जागांचे निकाल येण्यास सुरुवात झाली आहे. भाजप आणि काँग्रेसने प्रत्येकी दोन जागा जिंकल्या आहेत. ट्रेंड पाहिल्यास भाजप १७ जागांवर तर काँग्रेस ११ जागांवर पुढे आहे. म्हणजे दोन्ही पक्ष अजूनही बहुमतापासून दूर आहेत. येथे जादूचा आकडा २१ आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी दोन्हींच्या मतांचे आकडे ‘नोटा’ला मिळालेल्या मतांपेक्षाही कमी आहेत. In Goa, Shiv Sena, NCP got less votes than ‘NOTA’
भाजपला सर्वाधिक मतवाटा असून त्यानंतर अनुक्रमे काँग्रेस, मगोप, आप, तृणमूल काँग्रेस, गोवा फॉरवर्ड पक्ष यांचा क्रमांक लागतो. सध्या भाजप १७ जागांवर तर काँग्रेस ११ जागांवर आघाडीवर आहे. तीन जागांवर तृणमूल काँग्रेस, दोन जागांवर आम आदमी पार्टी, अपक्ष उमेदवार चार जागांवर आघाडीवर आहेत. सरकार स्थापन करण्यासाठी कोणत्याही पक्षाच्या बाजूने २१ जागा आवश्यक आहेत. सध्या दोन्ही पक्षांना ते अवघड दिसत आहे. अशा परिस्थितीत येथे त्रिशंकूची परिस्थिती निर्माण होऊ शकते.
उत्पल पर्रीकर यांचा पणजीतून पराभव
भाजप नेते मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर यांचा पणजीतून पराभव, उत्पल पर्रीकर यांचा पणजी विधानसभा मतदारसंघातून पराभव झाला. त्यांचा भारतीय जनता पक्षाच्या अटानासिओ मोन्सेरेत यांनी ७१६ मतांनी पराभव केला आहे. उत्पल यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती.
महाराष्ट्राचा शेजारी असलेल्या गोव्यात फक्त भाजप-काँग्रेसच नाही, तर शिवसेना आणि राष्ट्रवादीही निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. शिवसेना गोव्यात १२ जागांवर लढत आहे. मतमोजणी सुरु झाल्यानंतर अडीच तासांच्या अखेरीस शिवसेनेला पाव टक्के मते मिळाली. निवडणूक आयोगाच्या अधिकृत वेबसाईटवरील आकडेवारीनुसार शिवसेनेला ०.२५ % मतवाटा मिळाला आहे.
तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला तूर्तास १.०६% मते पडली आहे. विशेष म्हणजे हे दोन्ही आकडे ‘नोटा’ला मिळालेल्या मतांपेक्षाही कमी आहेत. कारण १.१७ % मतदारांनी ‘नोटा’चा पर्याय निवडला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App