वृत्तसंस्था
बीजिंग : चीनच्या अल्ट्रामॅरेथॉन स्पर्धेमध्ये २१ जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. बाययिन शहरात ही स्पर्धा आयोजित केली होती. In China Kills 21 In Ultramaratho due to Climet changes
अरुंद पायवाट असलेल्या डोंगरावर ही शर्यत आयोजित केली होती. डोंगरावर सोसाट्याचा वारा आणि जोरदार पाऊस झाला. अचानक वातावरणात बदल झाला. शनिवारी स्पर्धकांनी दोन ते तीन हजार मीटरचे अंतर कापल्यानंतर वातावरणात अचानक बदल झाले.
स्पर्धक डोंगरावरच अडकल्याने संपूर्ण रात्रभर चाललेल्या बचावकार्याद्वारे तब्बल १५१ जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. १७२ स्पर्धकांपैकी २१ जण मृत्युमुखी पडल्याचे वृत्त आहे.
तापमान अचानक खाली आल्याने स्पर्धकांना शारीरिक अस्वस्थता जाणवू लागली होती. काही जण धावताना खोल दरीत पडले. मात्र, किती जण बचावले, याचा शोध घेतला जात आहे. याबाबतचे वृत्त चिनी वृत्तसंस्थेने दिले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App