विशेष प्रतिनिधी
रायपूर : छत्तीसगढमध्ये एका नायब तहसीलदाराने चक्क परमेश्वराला आपल्या समोर हजर राहण्याची नोटीस जारी केली आहे. सक्त ताकीद देत देवाला नोटीस पाठवून समन्स बजावले आहेत.रायगढ शहरातील प्रभाग 25 मध्ये शिवमंदिर आहे.In Chhattisgarh notice of Tehsildar to God to appear before him
सुधा राजवाडे नावाच्या महिलेने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती, ज्यामध्ये शिवमंदिरासह 10 जणांवर सरकारी जमिनीवर अतिक्रमण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. उच्च न्यायालयाच्या निदेर्शानंतर तहसील कार्यालयाला त्याची चौकशी करावी लागली.
तहसील कार्यालयाने सर्व 10 जणांना नोटीस दिली आहे. या सर्व लोकांमध्ये शिवमंदिराचेही नाव आहे. नोटीसमध्ये व्यवस्थापक किंवा पुजारी असंही नमूद करण्यात आलेलं नाही. चक्क मंदिराच्याच नावानं नोटीस जारी करण्यात आली आहे.
यासंदर्भात नोटीस बजावणारे तहसीलदार गगन शर्मा आणि नायब तहसीलदार विक्रांतसिंह ठाकूर यांनी उच्च न्यायालयाच्या निदेर्शानंतर ही कारवाई करण्यात येत असल्याचे सांगितले. हे प्रकरण सरकारी जमिनीच्या बेकायदेशीर ताब्याचे असल्याने आणि 16 जणांनी जागा ताब्यात घेतल्याचे सांगण्यात आले होते,
मात्र 10 नावे जागेवर आली आहेत, असे त्यांचे म्हणणे आहे. त्यात एक मंदिर देखील आहे, जे ताब्यात घेतलेल्या जमिनीवर बांधले आहे. नोटीस बजावून सर्वांना दहा दिवसांची मुदत देण्यात आली असून, त्यानंतर पुढील कारवाई केली जाईल.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App