धक्कादायक बातमी : बिहारच्या एम्समधील ३८४ डॉक्टरांना कोरोना , नर्सिंग स्टाफही पॉझिटिव्ह ; आरोग्य विभागात उडाली खळबळ

वृत्तसंस्था

पाटणा : बिहारची राजधानी पाटणा येथील एम्समध्ये (AIIMS ) कोरोनाचा उद्रेक झाला आहे. त्यामुळे आरोग्य विभागाच्या एकच खळबळ उडाली आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांची खैर नाही तर आमचे कसे होणार अशा विवंचनेत कोरोनाचे रुग्ण पडले आहेत. In Bihar 384 Doctor’s of AIIMS are Suffering from Corona

कोरोनाचा कहर सुरु असताना ही एक धक्कादायक माहिती समोर आली. अनेक ठिकाणी रुग्णालयात रुग्णांची अहोरात्र सेवा करणाऱ्या डॉक्टरांना कोरोनाची लागण झाली आहे. दुसरीकडे बिहारमधील कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. मृतांचा आकडा सातत्याने वाढतो आहे. याच दरम्यान एम्समधील 384 डॉक्टर आणि नर्सिंग स्टाफला कोरोना झाल्याने आरोग्य विभागात एकच खळबळ उडाली आहे.



कोरोनामुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण अधिकच निर्माण झाले आहे. पाटणा एम्सचे वैद्यकीय अधीक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार, 384 डॉक्टर आणि नर्सिंग स्टाफ कोरोना पॉझिटिव्ह झाला. बिहारमधील पंचायत निवडणुका कोरोनामुळे पुढे ढकलल्या आहेत.

बिहारमधील स्थिती : 51 रुग्णांचा मृत्यू

आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार, मंगळवारी गेल्या 24 तासांत राज्यात कोरोनाचे 10,455 नवे रुग्ण आढळले आहेत. 51 रुग्णांनी जीव गमावला आहे. म्हणजेच, दर तासाला दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

In Bihar 384 Doctor’s of AIIMS are Suffering from Corona

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात