इम्रान खान यांचे राष्ट्राला संबोधन: म्हणाले- नवाझ मोदींना गुप्तपणे भेटायचे, मी रशियाला गेल्याने अमेरिका संतप्त; 9/11 आणि मीर जाफरचाही केला उल्लेख

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी त्यांच्या सरकारवर निर्माण झालेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर देशाला संबोधित केले. यावेळी इम्रान खान यांनी माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्यावर निशाणा साधला. नवाझ शरीफ हे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गुपचूप भेटत असत, असा मोठा आरोपच त्यांनी केला.Imran Khan’s address to the nation: He said- Nawaz used to meet Modi secretly, America is angry because I went to Russia; 9/11 and Mir Jafar were also mentioned


वृत्तसंस्था

इस्लामाबाद : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी त्यांच्या सरकारवर निर्माण झालेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर देशाला संबोधित केले. यावेळी इम्रान खान यांनी माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्यावर निशाणा साधला. नवाझ शरीफ हे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गुपचूप भेटत असत, असा मोठा आरोपच त्यांनी केला.

इम्रान खान यांचे भाषण वेळेवर सुरू होऊ शकले नाही. राष्ट्रीय सुरक्षा समितीच्या बैठकीमुळे इम्रान खान यांच्या भाषणाला उशीर झाला. पाकिस्तानच्या जनतेला संबोधित करताना पंतप्रधान इम्रान खान म्हणाले की, आज देशासाठी निर्णय घेण्याची वेळ आली आहे. पंतप्रधान इम्रान खान म्हणाले, “मी भाग्यवान आहे की अल्लाहने मला सर्व काही दिले आहे – प्रसिद्धी, संपत्ती, सर्वकाही. मला आज कशाचीही गरज नाही, त्याने मला सर्व काही दिले ज्यासाठी मी खूप आभारी आहे. पाकिस्तान माझ्यापेक्षा फक्त 5 वर्षांनी मोठा आहे, मी देशाच्या स्वातंत्र्यानंतर जन्मलेल्या पहिल्या पिढीतील आहे.



राष्ट्राला संबोधित करताना इम्रान खान म्हणाले की, मुशर्रफ यांची सर्वात मोठी चूक म्हणजे त्यांनी केलेली अमेरिकेचा वकिली आहे. ते म्हणाले, “मी मुक्त परराष्ट्र धोरणाचा समर्थक आहे. आमचे परराष्ट्र धोरण पाकिस्तानी लोकांसाठी आहे. मला भारत किंवा इतर कोणाचा विरोध नको आहे, असेही ते म्हणाले. इम्रान खान म्हणाले की, पाकिस्तान अमेरिकेच्या सोबतीने लढला आणि त्यांनीच निर्बंध लादले. आपल्या संबोधनात इम्रान खान म्हणाले की, मी झुकणार नाही आणि माझ्या जनतेलाही झुकू देणार नाही. आपला देश दहशतवादाच्या विरोधात असल्याचेही इम्रान म्हणाले.

इम्रान खान म्हणाले, “8 मार्च रोजी आम्हाला परदेशातून संदेश आला, त्यात बहाणा देण्यात आला की, ते पाकिस्तानवर का नाराज आहेत. आणि इम्रान खान यांना हटवल्यास पाकिस्तानला माफ केले जाईल. मात्र तसे झाले नाही तर पाकिस्तानला कठीण प्रसंगाला सामोरे जावे लागेल.”

मला राजीनामा देण्यास सांगितले होते : इम्रान खान

पाकिस्तानचे पंतप्रधान म्हणाले, रविवारी पाकिस्तानचा फैसला होईल, मला कोणीतरी राजीनामा देण्यास सांगितले. जे माझ्यासोबत क्रिकेट खेळायचे त्यांनी मी शेवटच्या चेंडूपर्यंत लढत असल्याचे पाहिले आहे. मी आयुष्यात कधीही हार मानली नाही. निकाल काहीही लागो, त्यानंतर मी आणखी मजबूत होऊन समोर येईन, परिणाम काहीही होवो.

रशियात जाण्याच्या निर्णयावर अमेरिका नाराज : इम्रान खान

नुकत्याच झालेल्या रशियाच्या दौऱ्याचा संदर्भ देत इम्रान खान म्हणाले की, रशियाला जाण्याच्या निर्णयामुळे अमेरिका नाराज आहे आणि पाकिस्तानशी संबंध तोडण्याची धमकी दिली आहे. इम्रान खान म्हणाले की, अमेरिकेला माझ्यासोबत समस्या आहे, इतरांशी नाही. मी गेल्यावर अमेरिकेचा राग निघून जाईल. इम्रान खान म्हणाले की, कलंकित नेत्यांना पाकिस्तानच्या मदतीने सत्ता बळकावायची आहे. बाहेरच्या लोकांनी इथल्या लोकांसोबत कट रचल्याचा पुनरुच्चार इम्रान खान यांनी पुन्हा एकदा केला.”

Imran Khan’s address to the nation: He said- Nawaz used to meet Modi secretly, America is angry because I went to Russia; 9/11 and Mir Jafar were also mentioned

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात