विशेष प्रतिनिधी
मुंबई : आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजनेसाठी १० कोटीचा निधी निवडक लोकांसाठी झोळीत टाकला. सरकारचा निर्णय उत्तम मात्र या पत्रकार सन्मान योजनेचे निकष सुधारणा आवश्यक आहे. जोवर सर्वसमावेशक धोरण व भूमिका सरकार घेत नाही तोवर या १० कोटीच्या भिक्षेला काहीच अर्थ नाही, अशी प्रतिक्रिया एनयुजे महाराष्ट्र अध्यक्ष शीतल करदेकर यांनी व्यक्त केली. Improve the criteria for the Journalist Honor Scheme Demand of NUJ Maharashtra President Sheetal Kardekar
राज्यातील ज्येष्ठ पत्रकारांप्रति आदरभाव आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, त्यांना उतारवयात सन्मानपूर्वक आर्थिक साहाय्य मिळावे यासाठी आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजना आहे. पत्रकारांना आर्थिक साहाय्य करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी पत्रकार कल्याण निधी या योजनेच्या विश्वस्त मंडळामार्फत ज्येष्ठ पत्रकारांसाठी आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजना राबवण्यात येते.
या योजनेसाठी अत्यंत तोकडा निधी उपलब्ध करून दिला जातो. त्यामुळे मोजक्या पत्रकारांना तिचा लाभ मिळतो. अलीकडे मोठ्या प्रमाणात पत्रकारांना नोकऱ्या बदलाव्या लागतात किंवा सोडाव्या लागतात.विपन्नता येते. त्यामुळे कठोर नियम बदलावे अशी मागणी महाराष्ट्रातून होत होती.
पत्रकार कोण ? याची व्याख्या निश्चित केली पाहिजे. वयोमर्यादा ५०, कामाची वर्ष २०, सलग काम असण्याचा पुरावा नसेल तरीही पत्रकार, छायाचित्र पत्रकार, विडियो जर्नलिस्ट्स, माध्यमातील तांत्रिक सहाय्यक अशा सर्वाचा अंतर्भाव यात असावा, अशी अपेक्षा करदेकर यांनी व्यक्त केली
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App