विज्ञानाचे डेस्टीनेशन्स : आहारातील कार्बोहायड्रेट्सचे महत्व

कार्बोहायड्रेट्स शरीरातील ऊर्जेचा प्रमुख स्रोत आहेत. ते तुमचा मेंदू, किडनी, स्नायू, मज्जासंस्थेला इंधन पुरवण्याचे काम करतात. उदा. फायबर हे कार्बोहाड्रेट तुमच्या चयापचय शक्तीला बळ देतात, तुम्ही खात असताना पोट गच्च झाल्याचा संदेश पोचवतात व तुमच्या रक्तातील कोलस्टेरॉलची पातळी नियंत्रणात ठेवतात. शरीर अतिरिक्त कार्बोहाड्रेट्स तुमच्या स्नायू आणि यकृतामध्ये साठवून ठेऊ शकते व जेव्हा तुमच्या अन्नातील काब्रोहाड्रेट्सचे प्रमाण कमी झाल्यास त्याचा उपयोग करते.Importance of dietary carbohydrates

आहारातील कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण कमी झाल्यास तुम्हाला डोकेदुखी, थकवा, अशक्तपणा, मन एकाग्र करण्यातील अडचणी, मळमळ, अपचन, प्रथिने आणि खनिजांची कमतरता असे अनेक विकार जाणवू शकतात. कोणते कार्बोहायड्रेट्स खावेत याची माहिती हवी. ती अशी फळे, भाज्या, शेंगदाणे, राजगिरा, टरबूज, सूर्यफूल, जवस, सब्जा आदींच्या बिया, उपयुक्त स्टार्टचे विपुल प्रमाण असलेले रताळ्यासारखे पदार्थ. हे कार्बोहायड्रेट्स टाळावेत.

तुम्ही दररोज व्यायामातून ४०० ते ५०० कॅलरीज जाळत नसल्यास धान्ये टाळावीत. फ्रूट ज्यूसच्या माध्यमातून होणारा फळांचा अतिरेक नसावा. ग्लुटेनचे अधिक प्रमाण असलेली धान्ये टाळावीत. स्टार्टचे अधिक प्रमाण असलेल्या भाज्या व तळलेले पदार्थ नसावेत. कोणत्याही माध्यमातून शरीरात जाणारी साखर टाळावीच.

बहुतांश ४५ ते ५६ वयोगटातील प्रौढ त्यांना आवश्यक कॅलरीज कार्बोहायड्रेट्समधून मिळवतात. एक ग्रॅम कार्बोहायड्रेट्समध्ये ४ कॅलरीज असतात. तुम्ही दिवसभरातील तुमचा डाएट प्लॅन पाळून २००० कॅलरीज मिळवत असल्यास तुम्ही दिवसभरात जास्तीत जास्त २२५ ते ३२५ ग्रॅम काब्रोडायड्रेट्स आहारात घेणे अपेक्षित आहे. कार्बोहायड्रेट्स योग्य प्रकारात व योग्य वेळेस घेतल्यास तुमच्या शरीरासाठी फायदेशीर ठरतात व तुम्हाला तुमचे वजन घटविण्यासही मदत करतात.

कार्बोहायड्रेट्सचे अनेक फायदे असले, तरी तुम्ही ते कमी प्रमाणात घेत आहात, हे सुनिश्चित करा. त्यांचे अतिरिक्त प्रमाण असलेला आहार घेतल्यास तुमच्या रक्तातील साखर वाढेल व तुमचे वजनही मोठ्या प्रमाणात वाढेल. त्याचवेळी तुमच्या शरीरात योग्य प्रमाणात कार्बोहायड्रेट्स जाणेही तेवढेच महत्त्वाचे आहे, त्यातून तुमच्या शरीराला आवश्यक पौष्टिक पदार्थ मिळतील व वजन योग्य राखले जाईल.

Importance of dietary carbohydrates

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात