देवेंद्र फडणवीसांनी सांगितली महाराष्ट्रातल्या दंगलीची क्रोनॉलॉजी आणि मोडस ऑपरेंडी!! कोण कसे वागले??

प्रतिनिधी

पुणे : त्रिपुरा मध्ये झालेल्या कथित हिंसाचाराच्या घटनेवरून महाराष्ट्रात अमरावती, मालेगाव, नांदेड, भिवंडी आदी शहरांमध्ये रझा अकादमीने मोर्चे काढले. त्या मोर्चांमध्ये दगडफेक करण्यात आली. दंगल झाली. Devendra Fadnavis tells chronology and modus operandi of riots in Maharashtra !! Who behaved how

या दंगलीची नेमकी मोडस ऑपरेंडी आणि त्याच्या आगेमागेची क्रोनोलॉजी माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज स्पष्ट करून सांगितली आहे. त्रिपुरा आणि त्यानंतरच्या घटनेच्या वेळी नेमके कोण कसे वागले?, याचा तपशील त्यांनी सादर केला आहे.



  • भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यकारिणी बैठकीत देवेंद्र फडणवीस यांनी संबोधित केले. त्यावेळी त्यांनी मांडलेले प्रमुख मुद्दे असे :
  • आज महाराष्ट्रावर विश्वासार्हतेचे मोठे संकट! सरकार कुठे आहे, हे विचारण्याची वेळ आली आहे.
  • एक मुख्यमंत्री आहे, त्यांना कुणी मानायला तयार नाही.प्रत्येक मंत्री स्वतःला मुख्यमंत्री समजतो आणि जनतेचे मात्र हाल होत आहेत.
  • सरकार हे कायद्याचे राज्य नाही तर ‘काय दे‘ चे राज्य आहे. राज्यात सत्ताधाऱ्यांची नुसती वाटमारी चालली आहे आणि शेतकऱ्यांकडे मात्र कुणी पाहायला तयार नाही.

राजकारणाचे गुन्हेगारीकरण !

  • राज्यात दहशतवाद्यांशी व्यावसायिक संबंध आणि अवैध रेती, अवैध दारू आणि सट्टा गावोगावी. महाराष्ट्राची अशी अवस्था कधीच झाली नव्हती.
  •  आमच्याकडे इनामी नाही आणि बेनामी नाही. त्यामुळे आम्ही कुणाला घाबरत नाही.
  • अमरावतीत जे घडले ती कोणती घटना नाही तर एक प्रयोग आहे. सावध व्हा.

 त्रिपुरात काय झाले?

  • 26 ऑक्टोबर : बांगलादेशमध्ये हिंदूंवर झालेल्या अत्याचाराविरोधात त्रिपुरात रॅली झाली.
  •  28 ऑक्टोबर : फेक न्युज फॅक्टरीचे काम सुरू, त्रिपुरा पोलिसांनी कारस्थान उघड केले.
  •  8 नोव्हेंबर : राहुल गांधीचे ट्विट
  • आणि मग प्रयोग सुरू होतो. हा हिंसाचार सरकार समर्थित होता.
  • अमरावतीत SRP च्या 7 तुकड्या होत्या. पण त्यांना कोणते आदेश दिले गेले नाहीत.
  •  २०१२ मध्ये आझाद मैदानात जे झाले तोच सेम पॅटर्न इथे घडला. पोलिसांवर हल्ले करणाऱ्यांना अटक केली नाही. आमचे महाराष्ट्राचे पोलिस काय मार खाण्यासाठी आहेत का ?
  •  विचारांचा नक्षलवाद आता नाही. आता तो दहशतवाद्यांशी निगडित आहे. भाजपचा कार्यकर्ता कधीही दंगल करीत नाही. पण कुणी अंगावर आले तर सोडणार नाही.
  •  आम्ही सर्वसमावेशकतेचे राजकारण करतो, पण लांगूलचालन करीत नाही.
  • लांगूलचालन करणाऱ्या शक्तींना वाटत असेल की आता आपले सरकार आहे, तर आपण काहीही करू. पण भाजपचा कार्यकर्ता असे होऊ देणार नाही.
  • एका मुलीवर ४०० लोक बलात्कार करतात, काय चालले आहे महाराष्ट्रात?सरकार म्हणते आम्ही शक्ती कायदा करू. पण सरकारमध्ये केवळ ‘भक्ती‘ उपक्रम चालू आहे.
  •  मराठवाडा, विदर्भाच्या सर्व योजना बंद. शेतकऱ्यांना कोणतीही मदत नाही. वैधानिक विकास मंडळ बंद. सिंचन, पाण्याच्या योजना बंद. शेतकऱ्यांची वीज बंद ! शाळा सुरू केल्या आणि लगेच शाळांच्या वीज कापल्या.
  •  केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलवर कर कमी केला, तर देशातील २५ राज्यांनी त्यात भर घातली. पण महाराष्ट्र मात्र काहीच करायला तयार नाही. हे म्हणतात उत्पन्नाचे दुसरे साधन नाही.

मंदिरे बंद होती, पण दारू सुरू होती ना!
त्यातून तुम्ही कमाई केलीच ना!!

  • छोटी-छोटी राज्ये रडत नाही तर लढतात.महाराष्ट्रात मात्र रोज सकाळी मा. नरेंद्र मोदींचे नाव घेऊन रडतात. बिल्डरांना सवलती देताना यांना GST आठवत नाही, गरिबांना, शेतकऱ्यांना पैसे द्यायचे म्हटले की, जे पैसे टप्प्याटप्प्याने मिळत आहेत आणि मिळत राहतील त्या GSTचे रडगाणे गातात.
  • १०० कोटी लसीकरण केल्याबद्दल मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे खूप खूप अभिनंदन.
  •  अर्थव्यवस्था, लोकांचे जीव वाचवण्यासाठी हे लसीकरण अतिशय आवश्यक होते. हे सोपे काम नव्हते.पण ते भारताने करून दाखविले.
  •  पहिल्या दिवशीपासून कोविडचा सामना करताना नरेंद्र मोदीजी यांनी दृढता दाखविली.
  •  या महाविकास आघाडी सरकारने सर्वांसोबत विश्वासघात केला आहे. सामान्य माणसाची ताकद आता दाखविण्याची वेळ आली आहे.
  • जनतेसाठी, त्यांच्या कल्याणासाठी लढायला मैदानात उतरण्याची वेळ आली आहे.

 Devendra Fadnavis tells chronology and modus operandi of riots in Maharashtra !! Who behaved how

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात