वृत्तसंस्था
कानपूर: आय आय टी कानपूरने नवीन ई मास्टर्स प्रोग्राम चालू केले आहेत. यामध्ये ३ वर्षांचा कोर्स असून हा कोर्स नोकरी करणाऱ्या तसेच व्यवसाय करणाऱ्या लोकांना करता येईल.
IIT Kanpur launches E-masters course for working professionals
सरकारी खात्यात तसेच खाजगी कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या इंजीनियर्सचे ज्ञान व कौशल्य वाढवण्याची नवीन संधी आय आयटी कानपूरने दिली आहे. या कोर्सला मास्टर्स प्रोग्राम असे नाव देण्यात आले आहे. सदर कोर्स हा एक ते तीन वर्षात पूर्ण करता येतील. हे कोर्सेस जानेवारी २०२२ पासून सुरू होणार आहेत. या कोर्स अंतर्गत सायबर सेक्युरिटी, कम्युनिकेशन सिस्टीम, कमोडिटी मार्केट अँड रिस्क मॅनेजमेंट तसेच पावर सेक्टर रेगुलेशनचे विषय अंतर्भूत आहेत.
आयआयटीच्या माजी विद्यार्थ्यांचा स्तुत्य उपक्रम, शेतकऱ्यांच्या सहाय्याने ४०० एकरात जंगल निर्माण
या अभ्यासक्रमात बारा मॉड्युल्स आहेत. या कोर्ससाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यास ५५ टक्के मार्क व २ वर्षांचा अनुभव आवश्यक आहे. सध्या या कोर्सची फी ८ लाख रुपये आहे. परंतु जर या कोर्सचा कालावधी वाढला तर फी वाढू शकते. सदर कोर्स ऑनलाईन असून १५ दिवस कॉलेजमध्ये जाता येईल. HTTPS://emasters.iitk.ac.in/ या वेबसाईटवर जाऊन अधिक माहिती मिळेल व प्रवेशासाठी अर्ज भरता येईल. यात भाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांना डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून ऑनलाईन प्रशिक्षण मिळणार आहे. तसेच कॉलेजमध्ये जाऊन प्राध्यापकांचे मार्गदर्शन घेता येईल.
हा ईमास्टरप्रोग्राम चालू केल्यामुळे संस्थेने डिग्री क्रेडन्शियल प्रोग्राम घेऊन एक पाऊल पुढे टाकले आहे, असे आयआयटी कानपूरचे निर्देशक म्हणाले. ते पुढे म्हणाले की, यामध्ये व्यवसायिकांना शिक्षण मिळेल तसेच इतरही काही प्रोग्राम यात सुरू केले जाणार आहेत. या कोर्सेसमुळे आणि विषयातील प्रावीण्य मिळविण्यास मदत होईल आणि भारतीय डिजिटल मोहीमेतील महत्त्वपूर्ण भूमिका पार पडेल.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App