दहशतवाद्यांनी हल्ला केलेल्या लष्करी वाहनातून नेले जात होते इफ्तारसाठीचे सामान

Army Truck

दहशतवाद्यांनी जाणूनबुजून केले होते याच वाहनाला लक्ष्य, या हल्ल्यात पाच जवान शहीद झाले आहेत.

विशेष प्रतिनिधी

जम्मू-काश्मीर : भारतीय लष्कराच्या वाहनावर दोन दिवसांपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला झाला होता. पुंछ जिल्ह्यातील राजौरी सेक्टरमध्ये झालेल्या या हल्ल्यात राष्ट्रीय रायफल्सचे पाच जवान शहीद झाले. वाहनातील जवान इफ्तारसाठी सामान घेऊन परतत असल्याची माहिती आता समोर आली आहे. Iftar Party items were being carried in an army vehicle which was attacked by terrorists

२० एप्रिल रोजी संध्याकाळी राष्ट्रीय रायफल्सने इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते. यामध्ये आजूबाजूच्या गावातील पंच, सरपंचांसह रोजेदारांना बोलवण्यात आले होते. मात्र इफ्तार पार्टीसाठी जवान ज्या वाहनातून सामान घेऊन जात होते, त्या वाहनाला दहशतवाद्यांनी जाणूनबुजून लक्ष्य केले.

वृत्तानुसार, राष्ट्रीय रायफल्सच्या जवानांनी संग्योत परिसरात स्थानिक लोकांसाठी इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते. जम्मू-काश्मीरमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी असे कार्यक्रम आयोजित केले जातात. मात्र भारतीय लष्काराने इफ्तार पार्टी आयोजित केल्याने दहशतवादी नाराज झाले आणि त्यांनी लष्कराच्या वाहनावर हल्ला करण्याचा कट रचला, अशी माहिती समोर आली आहे. कारण, दहशतवाद्यांना जम्मू-काश्मीरमधील लोक भारतीय लष्कराच्या जवानांसोबत मिसळलेले आवडत नाहीत. दहशतवाद्यांना असे वाटते की हे लोक मग त्यांचे मुखबिर आहेत. गुरुवारी दुपारी लष्कराचे वाहन इफ्तारचे साहित्य घेऊन छावणीकडे परतत होते. त्याचवेळी खराब हवामानाचा फायदा घेत दहशतवाद्यांनी वाहनाला लक्ष्य केले. आधी गोळ्या झाडल्या आणि नंतर ग्रेनेडने हल्ला केला. यानंतर गाडीने पेट घेतला.

Iftar Party items were being carried in an army vehicle which was attacked by terrorists

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात