ज्ञानवापीला मशीद म्हणाल, तर वाद होतील; त्रिशूल मशिदीत काय करतंय?? मुस्लिमांनो, ऐतिहासिक चूक सुधारा; योगी कडाडले!!

वृत्तसंस्था

लखनौ : काशीतील ज्ञानवापीच्या सर्वेक्षणाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिल्यानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे अत्यंत महत्त्वाचे विधानसमोर आले आहे. ज्ञानवापीला मशीद म्हणाल, तर वाद होतील. ही ऐतिहासिक चूक झाली आहे. मुस्लिमांनी पुढे येऊन ती सुधारली पाहिजे, असा गंभीर इशारा योगी आदित्यनाथ यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत दिला. If you call Gnanavapi a mosque, there will be arguments; What is Trishul doing in the mosque??

योगींची ही स्फोटक मुलाखत देशभर खळबळ माजवत आहे. योगींनी या मुलाखतीत एकापाठोपाठ एक स्फोटक वक्तव्य केली असून त्यांनी दुहेरी मापदंड आजमावणाऱ्या पुरोगाम्यांचा बुरखा टरकावला आहे.

ज्ञानवापीला मशीद म्हणाल, तर वाद होतील. मशिदीत त्रिशूल काय करतेय?? तिथे देवदेवतांच्या मूर्ती आहेत. त्या तर आम्ही ठेवलेल्या नाहीत. ज्ञानवापीच्या भिंती ओरडून सांगताहेत आपण कोण आहोत??, मुस्लिम समाजानेच पुढे येऊन ही ऐतिहासिक चूक झाली आहे. आम्हाला समाधान हवे आहे, असे म्हटले पाहिजे, अशा कठोर शब्दांमध्ये योगी आदित्यनाथ यांनी ज्ञानवापी मशिदीवर टिप्पणी केली आहे.

योगींच्या या वक्तव्यामुळे देशभर खळबळ माजली असून पूरोगाम्यांमध्ये राजकीय भूकंप झाला आहे.

त्याचवेळी योगींनी पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेश हे तुलना करून दुहेरी मापदंड आजमावणाऱ्या पुरोगाम्यांना आणि विरोधकांना फटकारले आहे. 2017 पासून मी मुख्यमंत्री आहे. त्यानंतर उत्तर प्रदेशात एकही दंगा झालेला नाही. लोकसभा निवडणुका, पंचायत निवडणुका, महापालिका निवडणुका शांततेत झाल्या. पण पश्चिम बंगालमध्ये प्रत्येक निवडणुकीत हिंसाचार झाला. शासकीय यंत्रणा ताब्यात घेऊन त्यांचा मनसोक्त गैरवापर केला. पण पुरोगामी त्यावर गप्प राहिले. असले दुहेरी मापदंड आजमावणारे हे पुरोगामी संपूर्ण देशालाच पश्चिम बंगाल बनवू पाहत आहेत, अशा स्पष्ट शब्दात योगी आदित्यनाथ यांनी त्यांचे वाभाडे काढले.

त्याचवेळी त्यांनी विरोधकांच्या “इंडिया” आघाडीवर भाष्य केले. चोला बदलने से पिछले कर्मों से मुक्ती नही मिलेगी, अशा शब्दात त्यांनी “इंडिया” आघाडीवर निशाणा साधला. योगींच्या मुलाखतीमुळे देशभर खळबळ माजली असून पुरोगाम्यांमध्ये “राजकीय भूकंप” झाला आहे.

If you call Gnanavapi a mosque, there will be arguments; What is Trishul doing in the mosque??

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात