Manipur violence case : केंद्र सरकार सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली तपास करण्यास तयार


महिलांवरील हिंसाचाराचा सामना करण्यासाठीही आपल्याला यंत्रणा उभी करावी लागेल.

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : मणिपूर व्हायरल व्हिडीओ प्रकरणी दोन्ही पीडित महिला सुप्रीम कोर्टात पोहोचल्या आहेत. सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड, न्यायमूर्ती जेबी परडीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे.  Manipur violence case Central government ready to investigate under supervision of Supreme Court

मणिपूरमधील दोन पीडित महिलांची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल म्हणाले की, महिला या प्रकरणाची सीबीआय चौकशी आणि केस आसामला हस्तांतरित करण्याच्या विरोधात आहेत. त्याचवेळी सरकारतर्फे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी म्हटले आहे की, आम्ही कधीही केस आसामला हस्तांतरित करण्याची विनंती केलेली नाही. हे प्रकरण मणिपूरबाहेर हलवण्यात यावे, असे आम्ही म्हटले आहे.

याशिवाय तुषार मेहता यांनी, सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीवर केंद्राचा आक्षेप नाही. सर्वोच्च न्यायालयाने देखरेख ठेवल्यास पारदर्शकता दिसेल. असंही सांगितलं

चंद्रचूड म्हणाले, आपण इतर कोणत्याही व्हिडिओची वाट पाहू नये. केंद्राने दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात लैंगिक छळाची इतरही अनेक प्रकरणे असल्याचे दिसून येते. इतर महिलांवरील हिंसाचाराचा सामना करण्यासाठीही आपल्याला यंत्रणा उभी करावी लागेल. या तीन महिलाच नव्हे, तर गुन्ह्याला बळी पडणाऱ्या प्रत्येक महिलेसाठी व्यवस्था असायला हवी.

Manipur violence case Central government ready to investigate under supervision of Supreme Court

महत्वाच्या बातम्या 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात