तेलंगणात काँग्रेसचा BRS ला धोबीपछाड; याचा अर्थ प्रादेशिक पक्षाच्या पराभवाने INDI आघाडीत कायमचा बिघाड!!

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : तेलंगणातील मतदान काल पार पडल्यानंतर आलेल्या एक्झिट पोल मध्ये राज्यात काँग्रेस मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समिती अर्थात BRS ला धोबीपछाड देण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. काँग्रेससाठी ही समाधानाची बाब असली, तरी काँग्रेसच्या दीर्घकालीन राजकारणासाठी मात्र ही घातक ठरणारी बाब आहे. कारण सोनिया गांधींच्या पुढाकाराने जी
INDI आघाडी अस्तित्वात आली आहे, तिच्यावरच कुठाराघात करणारा निकाल तेलंगणात लागण्याची शक्यता आहे. If Congress wins in telangana, it will be trouble for INDI alliance in 2024

हा नेमका कुठाराघात कोणता आणि त्याचा परिणाम INDI आघाडीवर कसा होणार??, याचा बारकाईने विचार केला, तर एक बाब स्पष्ट होते, ती म्हणजे काँग्रेसने तेलंगणात भाजप सारख्या राष्ट्रीय पक्षाचा पराभव केलेला नसून भारत राष्ट्र समिती अर्थात BRS या प्रादेशिक पर पक्षाचा केलेला पराभव असेल आणि हा INDI आघाडीत सध्या असलेल्या प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांचे खऱ्या अर्थाने राजकीय डोळे उघडणारा असेल!!

येथे एक बाब लक्षात घेतली पाहिजे, ती म्हणजे वेगवेगळ्या राज्यांमध्ये प्रादेशिक पक्ष विशेषतः शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस, नितीश कुमार यांचे संयुक्त जनता दल, लालूप्रसाद यादव यांचे राष्ट्रीय जनता दल, एम. के. स्टालिन यांचा द्रविड मुन्नेत्र कळघम हे प्रादेशिक पक्ष भाजपच्या विरोधात कितीही असले, तरी या पक्षांना काँग्रेस प्रबळ झालेली बिलकुल चालणार नाही. कारण काँग्रेसचे प्रबळ होणे म्हणजे भाजप पेक्षा वर उल्लेख केलेल्या नेत्यांचे प्रादेशिक पक्ष कमकुवत होणे होय आणि हे प्रादेशिक पक्ष कमकुवत झाले, तर त्यांच्या नेत्यांचे दिल्लीतले राजकीय महत्त्व काँग्रेस हायकमांड पुढे काय उरणार??, हा मूलभूत प्रश्नच आहे.

त्यामुळे एक्झिट पोलचा अंदाज खरंच ठरला तर, काँग्रेसने तेलंगणामध्ये जरी BRS चा पराभव केला, तर तो काँग्रेसच्या दिल्लीतल्या राजकारणासाठी सावधगिरीचा इशारा देणाराच किंबहुना घातक ठरणारा निकाल असण्याची शक्यता आहे. कारण INDI आघाडीतले
बाकीचे प्रादेशिक पक्ष आणि त्यांचे नेते ताबडतोब संशयग्रस्त होऊन ते आपापल्या राज्यांमध्ये काँग्रेसचा “करेक्ट कार्यक्रम” करण्याची दाट शक्यता आहे.

पाच राज्यांच्या निवडणुकीच्या कालावधीत समाजवादी पार्टीचे नेते अखिलेश यादव यांनी उघडपणे ती शक्यता बोलून दाखविलीच होती. अखिलेश यादव हे वर उल्लेख केलेल्या सर्व नेत्यांपेक्षा खऱ्या अर्थाने बळकट प्रादेशिक नेते आहेत. कारण ते उत्तर प्रदेशातून येतात आणि उत्तर प्रदेशात त्यांच्या आणि भाजपच्या संघर्षात काँग्रेसला ते खूपच पिछाडीवर ढकलू शकतात. काँग्रेसचा तेलंगणातला संभाव्य विजय हा अखिलेश यादव यांचे देखील राजकीय डोळे उघडणारा असेल. त्यामुळे तेलंगणातल्या विजयातून काँग्रेसला कदाचित तात्पुरता आनंद मिळूही शकेल, पण तो आनंद खऱ्या अर्थाने दीर्घकाळ टिकणारा नसण्याची दाट शक्यता आहे.

If Congress wins in telangana, it will be trouble for INDI alliance in 2024

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात