IAS OFFICER : अपयशावर मात करत अनुपमा यांनी असं मिळवलं यश ! संपूर्ण भारतात 386 वा क्रमांक …

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : संघ लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होणे खूप कठीण आहे आणि त्यासाठी कठोर परिश्रम तसेच सकारात्मक विचार आवश्यक असतात. आयएएस अधिकारी अनुपमा अंजली यांनीही स्वत:ला मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त ठेवून यूपीएससीचा कठीण प्रवास पूर्ण केला. एकदा नापास झाल्यानंतर, अनुपमा अंजली यांनी दुसऱ्या प्रयत्नात यश मिळवलं म्हत्त्वाचं म्हणजे त्यांचा प्रवास यूपीएससी उत्तीर्ण होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रचंड प्रेरणादायी आहे. IAS OFFICER: Anupama overcame failure and achieved success like this! Number 386 in all of India …

अनुपमा अंजली यांनी  मेकॅनिकल इंजिनीअरिंगमध्ये बी.टेक पदवी मिळवली आणि त्यानंतर त्यांनी यूपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली, पण पहिल्या प्रयत्नात त्यांना यश मिळाले नाही. असे असतानाही त्यांनी हार न मानता दुसऱ्यांदा परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. पहिल्याच प्रयत्नात अपयश आल्यानंतर अनुपमा अंजली यांनी स्वत:ला मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या फिट ठेवलं. दुसऱ्या प्रयत्नात मिळालं यश त्यांनंतर त्यांनी 2018 च्या UPSC परीक्षेत यश मिळवले आणि संपूर्ण भारतात 386 वा क्रमांक मिळवून IAS होण्याचे स्वप्न पूर्ण केले.



UPSC परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर अनुपमा यांना आंध्र प्रदेश केडर मिळाले आणि त्यांची पहिली पोस्टिंग गुंटूर जिल्ह्याचे सह जिल्हाधिकारी म्हणून झाली. अनुपमा त्यांच्या जिल्ह्यातील गरीब मुलांना मदत करतात आणि UPSC उत्तीर्ण होण्याची इच्छा असलेल्यांना तयारीचा सल्लाही देतात.

वडील आयपीएस अधिकारी

डीएनएच्या रिपोर्टनुसार, अनुपमा अंजली यांचे वडील आयपीएस अधिकारी असून ते भोपाळमध्ये तैनात आहेत. अनुपमा म्हणाल्या की, मी माझे वडील आणि आजोबा यांच्याशी संवाद साधत मोठी झाले, ते दोघेही सरकारी कर्मचारी होते. त्यांच्यासोबत राहिल्याने मला जाणवले की आपण सभोवतालच्या लोकांना कशी मदत करू शकतो. त्यानंतर माझी यूपीएससीमध्ये करिअर करण्याची प्रेरणा बनली.

कशी केली परीक्षेची तयारी

अनुपमा अंजली UPSC परीक्षेच्या तयारीच्या वेळी रोज सकाळी ध्यान करूनच दिवसाची सुरुवात करायच्या. त्या म्हणतात की, तुमचा दिवस कितीही व्यस्त असेल, पण सकाळी काही तास म्हणजे दिवसाची सुरुवात व्यवस्थित करा. मेडिटेशननंतर अनुपमा एकट्याचं चहा घेऊन बसायच्या आणि सेल्फ टॉक करायच्या आणि स्वतःला प्रेरित ठेवायचा प्रयत्न करायच्या. याशिवाय त्या शारीरिक व्यायामही करायची. त्या पुढे म्हणाल्या,  काहीवेळा विद्यार्थी 12-12 तास अभ्यास करतात. तेव्हा विद्यार्थी शारीरिक आणि मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. हे चूक आहे. रोज फक्त 20 मिनिटं चाललं तरी तुम्हाला फ्रेश वाटेल… असं देखील त्या म्हणाल्या..

IAS OFFICER : Anupama overcame failure and achieved success like this! Number 386 in all of India …

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात