संसद सदस्यत्व रद्द झाल्यानंतर राहुल गांधी पहिल्यांदाच आले प्रसारमाध्यमांसमोर, म्हणाले…

… मग ते २० हजार कोटी रुपये कोणाचे आहेत? असा प्रश्नही उपस्थित केला आहे.

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : मानहानीच्या प्रकरणात दोषी ठरल्यानंतर आणि संसदेतून अपात्र ठरल्यानंतर राहुल गांधी आज (25 मार्च) प्रथमच मीडियासमोर हजर झाले. यावेळी ते म्हणाले की, ‘’भारतातील लोकशाहीवर हल्ला होत आहे, रोज नवनवीन उदाहरणे पाहायला मिळत आहेत.’’ I will continue to ask questions and fight for democracy in India Congress leader Rahul Gandhi day after his disqualification as MP

‘’हुकूमशाहिच्या अंताची ही सुरुवात, लढत राहू’’ राहुल गांधींची खासदारकी रद्द झाल्यावर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया; भाजपानेही दिलं प्रत्युत्तर

याशिवाय “अदाणींची शेल कंपनी आहे, त्यात कोणीतरी २० हजार कोटी रुपये गुंतवले आहेत, ते अदाणींचे पैसे नाहीत ते इतर कुणाचे तरी आहेत. मग प्रश्न हा आहे की हे २० हजार कोटी रुपये कोणाचे आहेत? अदाणी आणि मोदी यांच्यातील नाते नवीन नाही, जुने आहे. मी याबद्दल प्रश्न विचारले आहेत.” असंही राहुल गांधींनी म्हटलं आहे.

मी प्रश्न विचारणे थांबवणार नाही –

राहुल गांधी म्हणाले, “मला कशाचीच भीती वाटत नाही, तुरुंगात टाकून तुम्ही मला घाबरवू शकत नाही, हा माझा इतिहास नाही. मी भारतासाठी लढत राहीन. मला संसदेत बोलू दिले नाही, संसदेचे अध्यक्ष तसे पत्रही लिहिले, पण प्रतिसाद मिळाला नाही. माझे भाषण संसदेतून काढून टाकण्यात आले, पण मी प्रश्न विचारणे सोडणार नाही.’’

 

ओबीसी समाजाचा अपमान केल्याचा आरोपावर काय म्हणाल? –

राहुल गांधी म्हणाले, “मी याआधीही म्हटले आहे की, सर्व समाज एक आहे, सर्वांनी एकत्र चालले पाहिजे. बंधुभाव असावा, सर्वांमध्ये प्रेम असावे, द्वेष नसावा, हिंसाचार नसावा. हा ओबीसींचा मुद्दा नाही, मोदी आणि अदाणी यांच्या संबंधांचा मुद्दा आहे, मला उत्तर हवे आहे की अदाणींकडे २० हजार कोटी कुठून आले?”

पंतप्रधान ‘या’ भ्रष्ट माणसाला का वाचवत आहेत? –

पंतप्रधान मोदींवर निशाणा साधत राहुल गांधी म्हणाले की, ‘’मोदी माझ्या पुढच्या भाषणाला घाबरले आहेत, अदाणींना मिळालेल्या पैशाचे उत्तर कोणी का देत नाही. या प्रश्नाचाही संरक्षण मंत्रालयाने विचार करायला हवा. हा पैसा कोणाचा आहे हे जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे. ’’ तसेच, राहुल पुढे म्हणाले की, “अदाणी हा भ्रष्ट माणूस आहे हे जनतेला समजले आहे आणि आता जनतेच्या मनात प्रश्न निर्माण झाला आहे, की पंतप्रधान या भ्रष्ट माणसाला का वाचवत आहेत?’’

I will continue to ask questions and fight for democracy in India Congress leader Rahul Gandhi day after his disqualification as MP

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात