…आरोप करणे हा ढोंगीपणा असल्याचे पवन कल्याण यांनी म्हटलं आहे.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : जनसेना पक्षाचे प्रमुख आणि आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनी शुक्रवारी तामिळनाडूच्या नेत्यांवर टीका केली आणि राज्यात हिंदी लादल्याचा आरोप करणे हा ढोंगीपणा असल्याचे म्हटले. ते म्हणाले की हे नेते हिंदीला विरोध करतात पण आर्थिक फायदा मिळवण्यासाठी तमिळ चित्रपट हिंदीत डब करून घेतात. या विधानानंतर त्यांनी असेही स्पष्ट केले की त्यांनी कधीही हिंदीला विरोध केलेला नाही.
त्यांनी एक्सवर लिहिले, ‘जबरदस्तीने एखादी भाषा लादणे किंवा आंधळेपणाने भाषेला विरोध करणे या दोन्ही प्रवृत्ती आपल्या भारत देशाच्या राष्ट्रीय आणि सांस्कृतिक एकतेचे मूलभूत उद्दिष्ट साध्य करण्यासाठी उपयुक्त नाहीत.
उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनी म्हटले की, “मी कधीही हिंदी भाषेला विरोध केलेला नाही. मी फक्त ती सर्वांसाठी सक्तीची करण्यास विरोध केला आहे. जेव्हा ‘एनईपी-२०२०’ स्वतः हिंदी भाषा सक्तीची म्हणून लागू करत नाही, तेव्हा तिच्या अंमलबजावणीबद्दल खोटी विधाने करणे म्हणजे जनतेची दिशाभूल करणे आहे.
NEP-2020नुसार, विद्यार्थ्यांना परदेशी भाषेसह कोणत्याही दोन भारतीय भाषा (त्यांच्या मातृभाषेसह) शिकण्याची मूभा आहे. जर त्यांना हिंदी शिकायची नसेल, तर ते तेलुगू, तमिळ, मल्याळम, कन्नड, मराठी, संस्कृत, गुजराती, आसामी, काश्मिरी, ओडिया, बंगाली, पंजाबी, सिंधी, बोडो, डोगरी, कोकणी, मैथिली, मैतेई, नेपाळी, संथाली, उर्दू किंवा इतर कोणतीही भारतीय भाषा निवडू शकतात.” आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App