नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लेक्स फ्रीडमॅन याला दिलेली दीर्घ मुलाखत, पाकिस्तानातल्या देश फुटायच्या घडामोडी आणि भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार तुलसी गबार्ड यांच्याशी झालेली चर्चा असा विलक्षण योगायोग भारतीय राजकीय वातावरणात साधला . जो योगायोग कुणाला सहज साध्य होत नाही, तो साधून आला. Modi podcast
पाकिस्तानात बलुचिस्तान मधल्या स्वातंत्र्य सैनिकांनी पाकिस्तानी सैन्याला दोनदा जेरीस आणले. त्यांनी आधी जाफर एक्सप्रेस बोलन प्रांतात रोखून धरली. त्यातले सगळे सुमारे 200 पाकिस्तानी सैनिक मारले. त्यानंतर पाकिस्तानी सैनिक घुसखोरी विरुद्ध कारवाई करत पुन्हा 90 सैनिक मारले. त्या पलीकडे जाऊन पाकिस्तान अज्ञात बंदूक धारकांनी भारताचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी हफीज सईद आणि अबु कताल त्यांना मारले. हे सगळे दोन दिवसांमध्ये घडले.
या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींची सर्वांत दीर्घ मुलाखत समोर आली. त्यामध्ये त्यांनी पाकिस्तानचे शेपूट कसे वाकडे होते, याचे सविस्तर वर्णन केले. 2014 मध्ये मोदी सरकारच्या शपथविधीला पाकिस्तानी पंतप्रधानांना सन्मानाने बोलवून शुभ सुरुवात करायचा प्रयत्न केल्यानंतर देखील पाकिस्तानी राज्यकर्ते सुधारले नाहीत. पाकिस्तानने भारताविरुद्ध छुपे युद्ध चालूच ठेवले. सगळ्या जगात दहशतवाद पसरवला. जगातल्या सगळ्या दहशतवादी कारवायांच्या तारा पाकिस्तानशीच जुळल्या. सध्या त्यांनीच पेरलेले विष त्यांच्या देशात उगवले. पण आता तरी पाकिस्तान राज्यकर्त्यांना लवकर सुबुद्धी येवो, असे मोदी या मुलाखतीत म्हणाले. त्यांचे हे शेवटचे वक्तव्यच फार गंभीर ठरले. कारण पाकिस्तानी राज्यकर्त्यांना सुबुद्धी आली, तर ठीक अन्यथा त्या देशाचे तुकडे पडून त्याची वाट लागल्याशिवाय राहणार नाही हेच मोदींच्या मुलाखतीतले “बिटवीन द लाईन्स” होते.
NSA Ajit Doval, US Director of National Intelligence Tulsi Gabbard discuss India-US ties Read @ANI Story | https://t.co/bxMRmhktCF#AjitDoval #TulsiGabbard #India #US pic.twitter.com/Nl7AYar1Pz — ANI Digital (@ani_digital) March 16, 2025
NSA Ajit Doval, US Director of National Intelligence Tulsi Gabbard discuss India-US ties
Read @ANI Story | https://t.co/bxMRmhktCF#AjitDoval #TulsiGabbard #India #US pic.twitter.com/Nl7AYar1Pz
— ANI Digital (@ani_digital) March 16, 2025
अजित डोवाल – तुलसी गबार्ड भेट
नेमक्या याच वेळी अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार तुलसी गबार्ड भारत दौऱ्यावर आल्या. त्यांनी भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्याशी चर्चा केली. भारत अमेरिका सुरक्षा सहकार्य या विषयावर त्यांनी भर दिला. पण त्यापलीकडे जाऊन दक्षिण आशिया मधली शांतता आणि सुव्यवस्था त्यामध्ये “भारताचा वाढता प्रभाव” या विषयावर डोवाल आणि गबार्ड यांनी विशेषत्वाने चर्चा केली. अजित डोवाल यांच्या नेतृत्वाखाली २० देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची म्हणजेच गुप्तहेर प्रमुखांची दिल्लीत दोन दिवस परिषद भरणार आहे. यानिमित्ताने तुलसी गबार्ड भारत दौऱ्यावर आल्या आहेत.
पंतप्रधान मोदींची मुलाखत, पाकिस्तान फुटायच्या घडामोडी आणि अजित डोवाल + तुलसी गबार्ड यांची भेट यांचा थेट परस्पर संबंध कुठेही कुणीही आपोआप जुळवला नाही. भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांचा सरकारांनी आणि त्यांच्या अधिकाऱ्यांनी तसा दावाही केला नाही. पण तो योगायोग जुळून आलाच. कारण पाकिस्तान फुटायच्या घडामोडी या कुठल्या अशा उघड भेटींनी किंवा चर्चांनी साध्य होत नाहीत, किंवा त्या साध्य देखील केल्या जात नाहीत. पण तरीही या तीनही बाबी एकत्र आल्या हा विलक्षण योगायोग ठरला, ही अत्यंत महत्त्वाची बाब देखील कुणी नाकारली नाही.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App