”मी मंदिरात जातो, अनेक धर्मग्रंथ वाचतो कारण…”; ‘ISRO’ प्रमुख एस सोमनाथ यांनी दर्शवला विज्ञान आणि अध्यात्मातील परस्पर संबंध!

तिरुवनंतपुरमधील पूर्णिकावू परिसरातील भद्रकाली मंदिरात जाऊन  केली प्रार्थना.

विशेष प्रतिनिधी

तिरुवनंतपुरम : चांद्रयान 3 च्या यशानंतर भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) प्रमुख एस सोमनाथ हे आज (रविवार) केरळची राजधानी तिरुवनंतपुरम येथे पोहोचले. तेथे त्यांनी पूर्णिकावू परिसरातील भद्रकाली मंदिरात प्रार्थना केली. पूजा केल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवादही साधला. I go to temple read many scriptures because ISRO chief S Somnath explained the difference between science and spirituality

ते म्हणाला, “मी एक शोधक आहे. मी चंद्राशी संबंधित माहिती शोधतो. विज्ञान आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टींचा शोध घेणे हा माझ्या आयुष्यातील प्रवासाचा एक भाग आहे. म्हणूनच मी अनेक मंदिरांना भेटी देतो आणि अनेक धर्मग्रंथ वाचतो. मी या विश्वातील माझ्या अस्तित्वाचा आणि माझ्या जीवनाचा अर्थ शोधण्याचा प्रयत्न करत आहे. आपल्या आतील आणि बाहेरील जगाचा शोध घेणे हा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे. मी बाह्य जगासाठी विज्ञानावर अवलंबून आहे आणि ज्ञान व आंतरिक जग शोधण्यासाठी मंदिरात येतो.”

यापूर्वी एस. सोमनाथ यांनी म्हटले की, ”भारत अवकाश क्षेत्रात आणखी अनेक उंची गाठू शकतो, त्यासाठी गुंतवणूक आणि सहकार्याची गरज आहे. भारताकडे चंद्र, मंगळ आणि शुक्र या ग्रहावर जाण्याची क्षमता आहे, परंतु आम्हाला आमचा आत्मविश्वास वाढवण्याची गरज आहे. आम्हाला अधिक गुंतवणुकीची गरज आहे आणि अंतराळ क्षे६ाचा विकास केला पाहिजे. यामुळे संपूर्ण देशाचा विकास होईल, हेच आमचे ध्येय आहे. पंतप्रधान मोदींनी आम्हाला दिलेले व्हिजन पूर्ण करण्यासाठी आम्ही तयार आहोत.”

I go to temple read many scriptures because ISRO chief S Somnath explained the difference between science and spirituality

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात