विशेष प्रतिनिधी
बेंगळुरू – Pegasus spyware issue वरून देशातले अख्खे राजकारण पेटले असताना प्रत्येक पक्षाचे नेते आपापल्या सोयीनुसार त्याच्यावर बोलून घेत आहेत. काँग्रेस आणि भाजपचे नेते एकमेकांवर संसदेत आणि बाहेरही तुटून पडत आहेत. पण कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि धर्मनिरपेक्ष जनता दलाचे नेते एच. डी. कुमारस्वामी यांनी त्यामध्ये नवा ट्विस्ट आणला आहे.I am not surprised by today’s revelations on phone tapping. The same issue had risen when my govt collapsed.
फोन टॅपिंग हा मुद्दा मूळात नवा नाही. सध्याच्या भाजप सरकारमध्येच नाही, तर आधीच्या विविध पक्षांच्या सरकारांच्या कारकिर्दीत देखील फोन टॅपिंग झाले आहे, अशा शब्दांमध्ये कुमारस्वामी यांनी भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांना घेरले आहे.
ते म्हणाले, फोन टॅपिंगची शंका माझे काँग्रेसच्या पाठिंब्यावरचे सरकार कोसळले तेव्हाही आली होती. अनेक नेत्यांनी ती शंका बोलून दाखविली होती. पण त्यावेळी त्या मुद्द्याकडे सोयीने दुर्लक्ष करण्यात आले. माझा पाठिंबा काढून घेणाऱ्या पक्षाला फोन टॅपिंगचा विषय समोर येणे रूचणारे नव्हते.
I am not surprised by today's revelations on phone tapping. The same issue had risen when my govt collapsed. This issue existed during the tenure of several govts even several years back. This is not a new issue to me: Former Karnataka CM HD Kumaraswamy on Pegasus report pic.twitter.com/GM5vfG6ooX — ANI (@ANI) July 20, 2021
I am not surprised by today's revelations on phone tapping. The same issue had risen when my govt collapsed. This issue existed during the tenure of several govts even several years back. This is not a new issue to me: Former Karnataka CM HD Kumaraswamy on Pegasus report pic.twitter.com/GM5vfG6ooX
— ANI (@ANI) July 20, 2021
आता भाजप सरकारच्या काळात काही पक्ष फोन टॅपिंग आणि हेरगिरीच्या विषयावर आक्रमकपणे बोलत आहेत. पण सध्याच्याच काय पण आधीच्या सरकारांच्या काळात देखील फोन टॅपिंग आणि सायबर हेरगिरी झालेली आहे. यामध्ये नवीन मुद्दा काहीही नाही, याकडे कुमारस्वामी यांनी लक्ष वेधले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App