“वादग्रस्त” राम मंदिराला देणगी देऊ नका!!; सिध्दरामय्या, कुमारस्वामी यांनी ओढली पीएफआयचीच “री”!!


वृत्तसंस्था

बंगळूरू – राम मंदिराच्या देणगीवरून कर्नाटकात काँग्रेस, जेडीएस आणि मोपला बंडाचे सेलिब्रेशन करणारी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया अर्थात पीएफआय हे एकाच भाषेत बोलू लागलेत. PFI, congress and JDS oppsed ram mandir, Anis ahmad, Siddaramaiah, HD Kumaraswamy oppse donationspps

काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री सिध्दरामय्या, जेडीएसचे माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी अयोध्येतील राम मंदिराला वादग्रस्त ठरवून त्याच्या बांधणीसाठी देणगी देऊच नये, असे आवाहन आपल्या कार्यकर्त्यांना केले आहे.हीच भाषा काहीच दिवसांपूर्वी पीएफआयचा कर्नाटकचा निमंत्रक अनिस अहमदच्या तोंडी होती. राम मंदिरासाठी कोणत्याही मुसलमान दुकानदार, व्यावसायिकाने एक पैशाचीही देणगी देऊ नये. ते राम मंदिर नाही, राष्ट्र मंदिर नाही… ते आरएसएसचे मंदिर आहे, अशी बेताल टीका अनिसने पीएफआयच्या एका जाहीर मेळाव्यात केली होती.

अनिसच्या त्याच वक्तव्याची री सिध्दरामय्या आणि कुमारस्वामी यांनी ओढली आहे. राम मंदिराला देणगी देऊ नये, असे त्यांनी आपापल्या पक्षांच्या कार्यकर्त्यांना सांगितले आहे. राम मंदिर – बाबरी मशीद वादाचा सुप्रिम कोर्टाने निकाल दिल्यानंतर राम मंदिराच्या प्रत्यक्ष कामाला सुरूवात होऊन एक वर्ष होत आले.

तरीही सिध्दरामय्या त्याला वादग्रस्त राम मंदिर असेच संबोधले आहे. यातून त्यांची मुस्लिम तुष्टीकरणाची मानसिकता दिसते, अशी टीका कर्नाटकचे मंत्री एस. इश्वरप्पा यांनी केली आहे. काँग्रेस आणि जेडीएस संपवायला एक – एक सिध्दरामय्या आणि कुमारस्वामी पुरेसे आहेत. त्यांच्या तोंडी पीएफआयची भाषा बरोबर शोभते, असे ते म्हणाले

PFI, congress and JDS oppsed ram mandir, Anis ahmad, Siddaramaiah, HD Kumaraswamy oppse donationspps
.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    भारतात आता एक देश एक चार्जर जलयुक्त शिवार योजना पुन्हा चालू होणार; शिंदे – फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी