मला निकाल माहिती आहे…!!; राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीची बातमी स्वतः शरद पवारांनी फेटाळलीI am not a presidential candidate, I will not accept leadership in 2024; Sharad Pawar’s strong statement
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : “ज्या पक्षाचे लोकसभेत ३०० पेक्षा जास्त खासदार आहेत. अशा स्थितीत निकाल काय असेल हे मला माहिती आहे. मी राष्ट्रपतीपदाचा उमेदवार नाही,” अशा स्पष्ट शब्दांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज दिवसभर चालविण्यात आलेल्या बातम्या फेटाळून लावल्या. माझ्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीच्या बातम्या निखालस खोट्या आहेत, असे ते म्हणाले.
एवढेच काय पण २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणूकीत देखील मी नेतृत्व स्वीकारणार नाही, अशा निःसंदिग्ध शब्दांमध्ये शरद पवारांनी आज दिवसभर चाललेल्या बातम्या फेटाळून लावल्या.
प्रशांत किशोर मला दोनदा भेटले होते. पण आमच्या फक्त त्यांच्या कंपनीविषयी चर्चा झाली. २०२४ च्या लोकसभा निवडणूकीविषयी आणि त्याच्या नेतृत्वाविषयी चर्चाच झाली नाही. तसेच राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीबद्दल देखील चर्चा झाली नाही. मी २०२४ च्या निवडणूकीमध्ये कोणाचे नेतृत्व स्वीकारणार नाही, असे शरद पवारांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
It is absolutely false that I will be a candidate for the Presidential election. I know what will be the result, given the party that has more than 300 MPs. I will not be a candidate for the Presidential election: NCP chief Sharad Pawar (File photo) pic.twitter.com/uzLbYip3nE — ANI (@ANI) July 14, 2021
It is absolutely false that I will be a candidate for the Presidential election. I know what will be the result, given the party that has more than 300 MPs. I will not be a candidate for the Presidential election: NCP chief Sharad Pawar
(File photo) pic.twitter.com/uzLbYip3nE
— ANI (@ANI) July 14, 2021
तत्पूर्वी, निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी शरद पवारांना राष्ट्रपतीपदाच्या निवडणूकीत उतरविण्यासाठी राजकीय जुळवाजुळव सुरू केल्याची बातमी इंडिया टुडेने दिली. सर्व विरोधी पक्ष एकत्र आले तर २०२२ मध्ये भाजप आणि एनडीए यांचा मुकाबला करणारे इलेक्ट्रोल कॉलेज उभे करता येऊ शकेल, असा प्रशांत किशोर यांचा होरा आहे.
पण त्यांच्या मनसूब्यात काँग्रेस सहभागी झाली तरच हे शक्य होऊ शकेल. त्यामुळे त्यांनी सोनिया, राहुल आणि प्रियांका गांधी यांची भेट घेऊन आपला मनसूबा त्यांच्या गळी उतरविण्याचा प्रयत्न केला आहे, असे इंडिया टुडेने दिलेल्या बातमीत म्हटले होते.यावर माध्यमांमध्ये दिवसभर राजकीय चर्चा झडल्या. पण सायंकाळी त्या सगळ्या चर्चांना काहीही अर्थ नसल्याचे स्वतः शरद पवारांनी स्पष्ट केले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App