भारतात २०२४ पर्यंत धावतील हायड्रोजन ट्रेन; ‘वंदे भारत’मध्ये स्लीपर क्लासवरही काम सुरू!

केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे प्रतिपादन

विशेष प्रतिनिधी

कोलकाता : पश्चिम बंगालमधील हावडा शहरात पोहोचल्यावर वंदे भारतचे भव्य स्वागत करण्यात आले. ओडिशाला गुरुवारी पहिला वंदे भारत ट्रेन मिळाली, ज्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. Hydrogen trains to run in India by 2024 Work on sleeper class in Vande Bharat is also underway

दुपारी पुरीहून निघालेल्या वंदे भारतचे रात्री ९.२० च्या सुमारास हावडा स्थानकावर पोहोचल्यावर भव्य स्वागत करण्यात आले. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्वतः पुरी ते हावडा असा प्रवास केला. तत्पूर्वी ट्रेन बंगालमधील खडपूरमध्ये दाखल झाली, तिथे ट्रेनचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.

यावेळी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, रेल्वे मंत्रालय हायड्रोजन ट्रेनवर काम करत आहे. २०२४ पर्यंत भारतात हायड्रोजन ट्रेनची चाचणी सुरू होईल. २०२४ पर्यंत देशात हायड्रोजन रेल्वे धावणार आहे. यासोबतच पाचशे किलोमीटरहून अधिक अंतराच्या वंदे भारतमध्ये स्लीपरच्या योजनेवरही मंत्रालय काम करत असल्याचे रेल्वेमंत्र्यांनी सांगितले. लवकरच लोक वंदे भारतमध्ये स्लीपर क्लासचा आनंद घेतील.

जूनअखेर संपूर्ण देश वंदे भारताशी जोडला जाईल, असे ते म्हणाले. मंत्रालय ४०० वंदे भारत चालवेल. ते म्हणाले की, ईशान्येलाही लवकरच वंदे भारताची भेट दिली जाईल. याचबरोबर ईशान्येला राष्ट्रीय राजधानीशी जोडण्यासाठी मोठ्या रेल्वे प्रकल्पांवर काम सुरू आहे.

Hydrogen trains to run in India by 2024 Work on sleeper class in Vande Bharat is also underway

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात